भारतीयांना लवकरच ई-पासपोर्टची सेवा

भारतीयांना लवकरच ई-पासपोर्टची सेवा

भारतीयांना लवकरच ई-पासपोर्ट सेवा मिळणार आहे. भारतात ई-पासपोर्ट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी याबाबत ट्विट केले आहे.

त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले की, भारत लवकरच नागरिकांसाठी ई-पासपोर्ट सेवा देणार आहे. हे पासपोर्ट बायोमेट्रिक डेटासह सुरक्षित असतील आणि जागतिक स्तरावर इमिग्रेशन पोस्टमधून सहजतेने प्रवास करण्यास उपयुक्त असतील.
परराष्ट्र मंत्रालय चीप आधारित नवीन पासपोर्ट जारी करण्याची तयारी करत आहे. पासपोर्टमध्ये एम्बेड केलेल्या मायक्रोचिपमध्ये पासपोर्ट धारकाच्या बायोमेट्रिक डेटाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती तसेच अनधिकृत डेटा ट्रान्सफरला अनुमती देणारी सुरक्षा वैशिष्ट्येसुद्धा असतील.

हे ई-पासपोर्ट आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त लोगोसह येतील. आणि लवकरच परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत भारतातील सर्व ३६ पासपोर्ट कार्यालये ई-पासपोर्ट जारी करतील. हे पासपोर्ट इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे बनवले जाणार आहेत. त्याशिवाय, ई पासपोर्ट बनवताना डेटा सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.

सरकारने सुरुवातीला चाचणी आधारावर अशा चिप्ससह वीस हजार अधिकृत आणि डिप्लोमॅटिक ई-पासपोर्ट जारी केले होते. त्या पासपोर्टची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. म्हणून आता परराष्ट्र मंत्रालय सर्व नागरिकांसाठी ई-पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

हे ही वाचा:

आतंकवाद्यांच्या निशाण्यावर रेशीमबाग

‘सत्ताधारी नेते लॉकडाऊनच्या धमक्या देऊन तणाव निर्माण करतायत’

इसिसमध्ये मुस्लिम तरुणांना सामील करणाऱ्या त्या दोघांना ८ वर्षांची सजा

महाराष्ट्रात दोन वेगळे कायदे आहेत काय?

 

आता वापरात असलेले छापील पुस्तिकांच्या स्वरूपातील पासपोर्ट मधील बनावट थांबवण्यासाठी हे ई-पासपोर्ट जारी केले जाणार आहेत. सध्या भारतात पाचशेहून अधिक पासपोर्ट केंद्रे कार्यरत आहेत. त्याचबरोबर देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्राची व्यवस्था सुनिश्चित करणे हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे ध्येय आहे.

Exit mobile version