मुंबई पोलिसांना परवडतील अशीच घरे देणार

पोलिस बांधवांना ५० किंवा २५ लाख परवडणार नाही. त्यामुळे कमी किंमतीत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांना परवडतील अशीच घरे देणार

पावसाळी अधिवेशनच्या पाचव्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या घरासंर्भात मोठी घोषणा केली आहे. पोलिस बांधवांना ५० किंवा ३५ लाख परवडणार नाही. त्यामुळे कमी किंमतीत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांना नाममात्र दरात घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणामुळे मुंबईत आपलं स्वत:चं स्वस्त घर होण्याच्यादृष्टीने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुनर्विकास प्रकल्प बांधकाम खर्चात पोलिस कर्मचाऱ्यांना घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी या घरांची किंमत ५० लाख निश्चित करण्यात आली होती. पण पोलिस बांधवांनी विनंती केल्यानंतर त्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. पोलिसांना नाममात्र दरात घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईतील बीडीडी पोलीस वसाहतीत अनेक कुटुंब वर्षानुवर्षे राहतात. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पोलिसांना ५० लाख रुपयांत हक्काचे घर देण्याची घेण्याची घोषणा तत्कालिन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. परंतु या घरांच्या किंमती परवडणाऱ्या नसल्यामुळे त्याला विरोध करण्यात आला. हा विरोध लक्षात घेऊन नंतर ठाकरे सरकारनं ही घरे पोलिसांना ५० नाही तर २५ लाख रुपयांत मिळतील असे जाहीर केले.

.

हे ही वाचा:

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

सफाई कामगार, गिरणी कामगारांनाही घरे

बीडीडी चाळीतील नागरिकांना ५०० चौरस फूटाची घरे देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्याचबरोबर अनेक वर्ष  रखडलेल्या गिरणी कामगारांनाही लवकरच घरे देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेतील २९ हजार सफाई कर्मचाऱ्यांना देखील हक्काचे घर मिळणार आहे. त्याचबरोबर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांना २५ हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं.

Exit mobile version