आरडाओरडा करणाऱ्या न्यायाधीशाला बडतर्फ करण्याची मागणी

दिल्लीतील द्वारकामधील न्यायाधीशाचा व्हीडिओ व्हायरल

आरडाओरडा करणाऱ्या न्यायाधीशाला बडतर्फ करण्याची मागणी

द्वारका येथील जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून दिल्ली उच्च न्यायालयाने या न्यायाधीशाला नोकरीतून बडतर्फ करण्याची विनंती दिल्ली सरकारकडे केली आहे. या व्हीडिओमध्ये हा न्यायाधीश उभा राहून आरडाओरडा करताना दिसत आहे. हा व्हीडिओ आता चांगलाच व्हायरल झाल्याने न्यायाधीशाचे प्रताप समोर आले आहेत.

एका अधिकाऱ्याने यासंदर्भात सांगितले की, सदर न्यायाधीश हे परिविक्षा (प्रोबेशन) काळात काम करत आहेत. आणि त्यांचा हा काळ रद्द करण्यात येईल. न्यायालयाने १३ सप्टेंबरलाच यासंदर्भात चर्चा केली होती आणि सदर न्यायाधीशाचे वर्तन आणि काम करण्याची पद्धत यावर चर्चा झालेली आहे.

सदर न्यायाधीशाचे वर्तन लक्षात घेता त्याला क दर्जा देण्यात आला आहे. या न्यायाधीशाविरोधात बार कौन्सिलकडे सात आठ तक्रारी आलेल्या आहेत. शिवाय, या न्यायाधीशाच्या अखत्यारित असलेल्या अनेक याचिका अन्य न्यायाधीशांकडे सोपविण्यात आल्या आहेत. द्वारका न्यायालयातील प्रमुख न्यायाधीशांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी पत्र लिहून याबाबतीत आदेश दिले आहेत. अमन प्रताप सिंग यांच्याकडून सर्व न्यायालयीन कामे काढून घेण्यात यावीत.

हे ही वाचा:

दहशतवादाचा नवा पॅटर्न ‘रेल जिहाद’

काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सवर अमित शहांचा प्रहार

सोने आणि हिऱ्यांच्या तस्करीत तिघांना अटक, ३.१२ कोटींचा माल जप्त!

पंतप्रधानांकडून बायडेन यांना चांदीच्या भारतीय ट्रेनचे मॉडेल भेट!

गेल्या जून महिन्यापासून सदर न्यायाधीश हा द्वारका न्यायालयात कार्यरत आहे. त्याची नियुक्ती मे महिन्यात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून झालेली आहे.

 

Exit mobile version