द्युती चंदवर चार वर्षांची बंदी, उत्तेजक चाचणीत ठरली दोषी

तिने मिळवलेली पदके आणि बक्षिसे जप्त केली जाणार

द्युती चंदवर चार वर्षांची बंदी, उत्तेजक चाचणीत ठरली दोषी

भारताची वेगवान महिला धावपटू द्युती चंद ही दुहेरी डोपचाचणीत दोषी ठरल्याने तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. द्युती हिने सन २०२१मध्ये पतियाळा येथील भारतीय ग्रांप्री ४ मध्ये १०० मीटर शर्यतीत ११.१७ सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला होता.

 

द्युतीचा बंदी कालावधी ३ जानेवारी, २०२३पासून लागू होईल. ५ डिसेंबर, २०२२ रोजी द्युतीचे नमुने संकलित करण्यात आले होते. त्यामुळे या तारखेपासून ते आतापर्यंत तिचे सर्व स्पर्धात्मक निकाल रद्द ठरतील. तिने मिळवलेली पदके आणि बक्षिसे जप्त केली जाणार आहेत. तसेच, गुणही काढून घेतले जातील,’ असे चैतन्य महाजन यांच्या अध्यक्षतेखालील डोपिंगविरोधी शिस्तपालन समितीने (एडीडीपी) गुरुवारी जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे.

 

‘अ‍ॅथलीटने निषिद्ध पदार्थाच्या सेवनाचा स्रोत सांगून समितीचे समाधान केले असले तरी ही सर्व बाब निष्काळजीमुळे झाल्याचे स्पष्ट होत नाही. परिणामी, एकूण परिस्थिती लक्षात घेता, ऍथलीटने नमूद केलेली कारणे डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन अनावधानाने केले होते, हे सिद्ध करण्यात अयशस्वी ठरली आहेत,’ असे समितीने स्पष्ट केले आहे.

 

हे ही वाचा:

बिपाशा बासूच्या मुलीला हनुमान चालीसाचे धडे!

मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रातोरात स्थगित

प्रज्ञानंदची जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

कोव्हिड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरला अटक

१) ऍथलीटने डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याऐवजी तिच्या फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेतला आणि तिने लिहून दिलेली औषधे घेतली. २) ऍथलीटने तिच्या सेवन केलेल्या औषधांच्या सामग्रीच्या संदर्भात लेबल तपासले नाही. ३) खेळाडूने ‘वाडा’द्वारे प्रतिबंधित पदार्थांच्या नवीन प्रकाशित यादीसह औषधांच्या सामग्रीची तपासणी केली नाही. या तीन बाबींचा प्रामुख्याने विचार करून द्युती चंदवर प्रामुख्याने बंदी घालण्यात आली आहे.

द्युतीची ५ आणि २६ डिसेंबर २०२२ रोजी भुवनेश्वरमधील ‘नाडा’च्या डोप नियंत्रण अधिकार्‍यांनी दोनदा चाचणी केली होती. तिच्या पहिल्या नमुन्यात प्रतिबंधित पदार्थ आढळला. तिच्याकडे सात दिवसांच्या कालावधीत ‘बी’ नमुना चाचणीसाठी जाण्याचा पर्याय होता, परंतु तिने तसे केले नाही. परिणामी ‘नाडा’ने तिला तात्पुरते निलंबित केले. द्युतीकडे आता ‘अँटीडोपिंग अपील पॅनेल’कडे दाद मागण्यासाठी २१ दिवस आहेत.

Exit mobile version