ध्वनीप्रदूषणात ठाकरे गटाचा मोठा आवाज; किशोरी पेडणेकरांचे भाषण कानठळ्या बसवणारे

आवाज फाऊंडेशनचे निरीक्षण

ध्वनीप्रदूषणात ठाकरे गटाचा मोठा आवाज; किशोरी पेडणेकरांचे भाषण कानठळ्या बसवणारे

दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद ध्वनिप्रदूषण नियमांच्या उल्लंघनामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करताना आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे . उद्धव ठाकरे यांच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील ध्वनिप्रदूषणाची मर्यादा १०१.६ डेसिबलपर्यंत पोहोचली. ध्वनिप्रदूषणाविरोधात लढणाऱ्या आवाज फाऊंडेशन या पर्यावरणवादी संस्थेच्या नोंदीनुसार, उद्धव ठाकरेंच्या सभेत मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात ध्वनी मर्यादा ९१.६ डेसिबलपर्यंत पोहोचली.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा झाला नाही. यंदा कोरोना संपल्यानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलात दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. शिवाजी पार्कवर नेत्यांची भाषणे सुरू होण्यापूर्वीच बालमोहन परिसराजवळ जमलेल्या लोकांनी ढोल वाजवण्यास सुरुवात केली. मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळील मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ आवाजाची मर्यादा १०१.६ डेसिबलपर्यंत पोहोचली. सभेला सुरुवात होण्यापूर्वी सायंकाळी ५:४० वाजता बालमोहन परिसरात आवाज मर्यादेचे सर्रास उल्लंघन झाले.

हे ही वाचा:

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक

वांद्रे-कुर्ला संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रवेशावेळी जोरदार गायन सुरू झाले. सायंकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्री सभेच्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी आवाजाची मर्यादा ९१.६ डेसिबलपर्यंत पोहोचली होती. आवाज फाऊंडेशनने शिवाजी पार्क परिसरात सायंकाळी साडेपाच ते रात्री नऊ या वेळेत ध्वनी प्रदूषण मोजले. वांद्रे-कुर्ला संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदूषणाची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी सायंकाळी ५. ३० ते९. ३०या वेळेत भाषणे केली.उद्धव ठाकरे गटातील इतर नेत्यांनी जोरदार भाषणे केली. एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनीही जोरदार भाषणे केली, मात्र फाऊंडेशनच्या पाहणीनुसार एकनाथ शिंदे यांच्या सभेतील ध्वनी प्रदूषण उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा कमी होते.

कोणाचा किती आवाज

उद्धव ठाकरे गट
किशोरी पेडणेकर – ९७ डेसिबल
नितीन देशमुख – ९३.५ डेसिबल
अंबादास दानवे – ९६.६ डेसिबल
सुषमा अंधारे – ९३.६ डेसिबल
उद्धव ठाकरे – ८८.४ डेसिबल

एकनाथ शिंदे गट
किरण पावसकर – ८८.५ डेसिबल
शहाराज पाटील – ८२.४ डेसिबल
राहुल शेवाळे – ७८.८डेसिबल
संयम माने – ८८.५डेसिबल
अरुणा गवळी – ८३.९ डेसिबल
शरद पोंखे – ८२.८ डेसिबल
गुलाबराव पाटील – ८६ डेसिबल
रामदास कदम – ८४.२ डेसिबल
एकनाथ शिंदे – ८९.६ डेसिबल

 

Exit mobile version