मंदिरांची भूमी असणाऱ्या आणि देवतांच्याही नावापेक्षा जास्त देवता असणाऱ्या भारताच्या महान महाकाव्याच्या म्हणजेच महाभारताच्या खलनायकाचे म्हणजे दुर्योधनाचे मंदिरही आहे, असे सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु, त्याही पेक्षा आश्चर्याची बाब अशी की, हा ज्येष्ठ कौरव चक्क सरकारला करही भरतो. केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील दुर्योधन मंदिर सरकारी नोंदीनुसार कर भरतात. याशिवाय, त्याला पारंपरिक विधी करताना मादक पदार्थ अर्पण केले जातात.
या ठिकाणाबाबत स्थानिक दंतकथा आहे. राजकुमार त्याच्या प्रवासादरम्यान थकलेला आणि तहानलेला होता. पिण्याच्या पाण्याची कमतरता होती, पण एका तथाकथित खालच्या जातीतील महिलेने त्याला ताडी प्यायला दिली. कथित खालच्या जातीत जन्मलेल्या कर्णाला राजपद देणाऱ्या दुर्योधनाने ते आनंदाने स्वीकारले. तसेच, ती स्त्री आणि तिच्या गावाला आशीर्वाद दिला आणि त्यांना जमीन दिली. त्यामुळे हे मंदिर त्याचे आभार मानण्यासाठी उभारण्यात आले आहे.
पेरुविरुथी मलानाडा येथील मंदिरात दररोज दुर्योधनाला ताडी दिली जाते. मात्र येथे दुर्योधनाची मूर्ती नाही. तर, दुर्योधनाच्या शस्त्राची पूजा येथे केली जाते. महाभारतात दुर्योधनाची ओळख द्रौपदीला कपडे उतरवण्याचा आदेश देणारा, पांडवांचे राज्य चोरण्याचा कट रचणारा राजा अशी आहे. परंतु या गावात तो एक सौम्य, संरक्षक देवता म्हणून पूजला जातो. गावकरी त्याला ‘अप्पूपा’ (आजोबा) म्हणतात.
मंदिरात मूर्ती नसणे, ताडीचा प्रसाद देणे या प्रथा अनेक दक्षिणेकडील मंदिरांमध्ये इतर गैर-वैदिक पद्धतींप्रमाणेच आहेत. गावकऱ्यांकडून ताडीचा प्रसाद घेणे अधिक मनोरंजक आहे. मात्र सर्वांत आश्चर्यकारक म्हणजे दुर्योधनाचे मंदिर कर भरते. हा कर मंदिराच्या उत्पन्नावर नाही. भारतात सर्व मंदिरे करमुक्त आहेत. मंदिराच्या आजूबाजूच्या पोरुवाझी गावात १५ एकर मंदिराच्या जमिनीवर शुल्क आकारले जाते.
हे ही वाचा:
गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण; १६ लाखांचे होते बक्षीस
दिल्लीतील विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळून सहा जण जखमी
“मुंबई शिक्षक, पदवीधर निवडणुकीत उबाठा सेनेने पैशाचा धुमाकूळ मांडला”
नीट पेपरलीक प्रकरणी सीबीआयची बिहारमधून पहिली अटक, दोघेजण ताब्यात!
‘जेव्हा मंदिरासाठी पट्टा जाहीर करण्यात आला तेव्हा जमीन देवतेच्या नावावर नोंदवण्यात आली. जमीन करार क्रमांक आणि सर्वेक्षण तपशील दाखवतात की जमीन दुर्योधनच्या मालकीची आहे. केरळमध्ये जेव्हापासून कर लागू झाला तेव्हापासून हा जमीन कर दुर्योधनच्या नावाने भरला गेला आहे,’ असे एका स्थानिक प्रशासकाने सांगितले. मंदिराच्या १५ एकर जमिनीपैकी आठ एकर भातशेती, तर उर्वरित वनजमीन असल्याचे मंदिर समितीचे सचिव रजनीश आर. सांगतात. जेव्हा तुम्ही पुरूवाझ्झीत असाल, तेव्हा दुर्योधनाचा धिक्कार करू नका.