‘वक्फ दुरुस्ती विधेयक- २०२४’ वर राजकारण तीव्र झाले आहे. याच दरम्यान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयका विरोधात आंदोलन करणाऱ्यांना मंत्री गिरीराज सिंह यांनी चांगलेच झापले आहे. भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या जमिनी वक्फ बोर्डाने जबरदस्ती बळकावल्या असून त्या सर्व हिंदूंच्या जमिनी होत्या आणि काँग्रेसने वक्फ बोर्डाला जमीन बळकावण्यासाठी प्रमाणपत्र दिल्याचे मंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.
एएनआयशी संवाद साधताना मंत्री गिरीराज म्हणाले, वक्फ बोर्डात कायदा करून गरीब मुसलमान पुरुष-महिला आणि पसमंदा यांना त्यात स्थान मिळायला हवे. वक्फ बोर्ड जमीन बळकावण्याच्या नादाला जाऊ नये, आंदोलन करू नये. कारण फाळणी दरम्यान जे लोक पाकिस्तानात गेले होते, तेथील सर्व जमिनी हिंदूंच्या होत्या आणि वक्फ बोर्डाने त्या जबरदस्ती बळकावल्या आणि काँग्रेसने त्याला एवढे अधिकार दिलेत की, वक्फ बोर्ड म्हणेल तेच खरे आहे.
हे ही वाचा :
आरडाओरडा करणाऱ्या न्यायाधीशाला बडतर्फ करण्याची मागणी
तिकिटासाठी इच्छुक सपा खासदाराच्या मुलावर मारहाण-अपहरण प्रकरणी गुन्हा !
दहशतवादाचा नवा पॅटर्न ‘रेल जिहाद’
इराणच्या कोळसा खाणीत स्फोट, ५१ जणांचा मृत्यू, २० जण जखमी!
दरम्यान, वाढत्या रेल्वे कटावर देखील मंत्री गिरीराज सिंह यांनी भाष्य केले. ते म्हणाले, कानपूरसह आता अनेक ठिकाणी रेल्वे उलटवण्याच्या घटना समोर येत आहेत. पण सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, यामागे एक षडयंत्र आहे, ज्याचा संबंध एका विशिष्ट समुदायाशी आहे, जो दहशतवादी कटात सामील आहे असे मत असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | Patna, Bihar: On Waqf (Amendment) Bill, 2024, Union Minister Giriraj Singh says, "A law should be made in the Waqf Board and poor Muslim women and Pasamanda should get a place in it. Waqf should not go on a land-grabbing spree… The Congress gave so many rights to the… pic.twitter.com/rMAs28LFyg
— ANI (@ANI) September 22, 2024