स्टेडियममधील जय श्रीरामचा नारा उदयनिधी स्टॅलिनला झोंबला!

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उदयनिधी स्टॅलिनला डिवचलं

स्टेडियममधील जय श्रीरामचा नारा उदयनिधी स्टॅलिनला झोंबला!

क्रिकेट मैदानावर जेव्हा भारत-पाकिस्तानची टीम समोरा-समोर असते तेव्हा तिथले वातावरण देशभक्तीमय होऊन जाते.विश्वचषक २०२३ च्या दरम्यान जेव्हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानची टीम मैदानावर उतरली तेव्हा तसाच नजारा पाहायला मिळाला.दरम्यान, यावेळी देशभक्ती वरून राम भक्ती पाहायला मिळाली. स्टेडियममध्ये जोरदारपणे जय श्री रामच्या घोषणा दिल्या.अनेक नेत्यांनी मॅचचा व्हिडिओ ट्विट केला आहे.भारत-पाकिस्तान खेळ संपला परंतु यावर आता जोरदार राजकारण होत आहे.

याची सुरुवात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली.स्टेडियममध्ये जय श्री रामच्या गाण्यावर थिरकणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचा व्हिडिओ त्यांनी प्रथम ट्विट केला.त्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर देखील यामध्ये सामील झाले.

हे ही वाचा:

इराणचा इशारा; गाझावरील हल्ले इस्रायलने थांबवावेत नाहीतर….

भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय

प्रशांत किशोर यांनी दिले नीतिश कुमारांना आव्हान

इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार

तथापि, सनातन धर्माबाबत बेताल वक्तव्य करणारे एमके स्टॅलिनचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांचे देखील विधान समोर आले आहे.पाकिस्तानी खेळाडूंच्या समोर जय श्री रामच्या घोषणा देणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्यांनी फटकारले आहे.

उदयनिधी म्हणाले, भारत आपल्या क्रीडा भावनेसाठी आणि आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंबरोबर करण्यात आलेले वर्तन हे अस्वीकारार्ह आहे.खेळ ही राष्ट्रांमध्ये एकता निर्माण करणारी शक्ती बनली पाहिजे आणि खऱ्या बंधुभावाला प्रोत्साहन दिले पाहिजे.द्वेष पसरवण्याचे साधन म्हणून त्याचा वापर करणे निषेधार्ह आहे.

 

 

 

Exit mobile version