माओवाद किंवा नक्षलवाद ही या भारत देशाला लागलेली कीड आहे जी भारतात राहून भारत पोखरायचे काम करत आहे. या माओवादाचा नायनाट करण्यासाठी गेले कित्येक वर्ष विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता या नक्षलवाद्यांचा खात्मा कारण्यासाठी ‘दुर्गा’ सज्ज झाल्या आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या महिला कमांडोजचे ‘दुर्गा फायटर’ हे पथक आता नक्षलवाद्यांसोबत दोन हात करणार आहे.
छत्तीसगड हे राज्य भारतातील काही नक्षलग्रस्त राज्यांपैकी एक आहे. दंतेवाडा, सुकुमा, बस्तर हे काही प्रमुख जिल्हे हे कायम नक्षली कारवायांचे केंद्र बनलेले असतात. जंगलात राहून आदिवासी समाजाचे शोषण करत या देशातील लोकशाही व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी हे नक्षलवादी लढा देत असतात. पण आता या नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळायला छत्तीसगड पोलिसांच्या दुर्गा फायटर कस्सून तयारीला लागल्या आहेत.
हे ही वाचा:
यंदा गणेशोत्सव मंडळांचा उत्साह फिका
मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर फिरला बुलडोझर, सोमैय्या म्हणतात ‘पुढचा नंबर…’
‘मोदी एक्सप्रेस’ ने जाऊया, गणरायाला वंदुया
एसटीच्या लोगोलाच केला ‘जय महाराष्ट्र’
आज रविवार, २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या बद्दलचे वृत्त पुढे आहे. छत्तीसगड महिला पोलिस कमांडोंची ‘दुर्गा फायटर’ ही तुकडी सुकुमा येथे दाखल झाली आहे. या तुकडीत एकूण ३२ महिला कमांडो आहेत. पुढचे महिनाभर त्यांचे प्रशिक्षण होणार आहे. त्या सर्व प्रकारच्या कमांडो ऍक्टीव्हीटी करणार आहेत. सुकूमाचे एसपी सुनील शर्मा यांनी या संबंधीची माहिती दिली आहे.
दरम्यान आज या दुर्गा फायटर्सनी जिल्ह्यातील नागरिकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांना राखी बांधून त्यांना नक्षलवाद्यांपासून संरक्षण करण्याचे वचन दिले आहे.