कोविशिल्डच्या दोन डोसेसमधील अंतर वाढणार?

कोविशिल्डच्या दोन डोसेसमधील अंतर वाढणार?

सरकारच्या तज्ज्ञांच्या समितीचा ॲस्ट्राझेनेका- ऑक्स्फर्डच्या कोविशिल्ड लसीच्या दोन्ही डोस मधील अंतर वाढवण्याच्या विचारात आहेत. काही आंतरराष्ट्रीय संशोधनांनुसार जर लसीच्या दोन डोस मधील अंतर जास्त असेल, तर लसीची परिणामकारकता देखील वाढते. याबाबत तज्ज्ञांची समिती पुढील आठवड्यात निर्णय घेणे अपेक्षित आहे.

ॲस्ट्राझेनेका- ऑक्स्फर्डच्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून केले जाते. सध्या या लसीसाठीची मुदत सुमारे सहा आठवडे आहे. ही मुदत यापूर्वी चार आठवडे होती. ती एप्रिलमध्ये वाढवून सहा आठवडे करण्यात आली.

हे ही वाचा:

मोदींनी पुन्हा घेतली कोरोनाची आढावा बैठक

अत्यावश्यक सेवेपलीकडील लोकांना नोंदणीशिवाय लस नाही!

पुण्यात आणखी ‘कडक निर्बंध’

अत्यावश्यक सेवेपलीकडील लोकांना नोंदणीशिवाय लस नाही!

दोन डोस मधील अंतर वाढवल्याने भारताच्या पुरवठा साखळीवरील ताण थोडा हलका व्हायला देखील मदत होईल. त्याबरोबरच भारताने सर्व प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे देखील शक्य होईल.

वैद्यकशास्त्रातील नामवंत नियतकालिक लँसेटने मार्च महिन्यात प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार कोविशिल्ड जर १२ आठवड्यांच्या अंतरात देण्यात आली, तर तिची परिणामकारकता ८१.३% एवढी असते. हेच जर ही लस सहापेक्षा कमी आठवड्यांच्या अंतरात दिली, तर तीची परिणामकारकता ५५.१% पर्यंत घसरते.

ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये झालेल्या संशोधनानुसार ही लस जेव्हा एका महिन्याच्या अंतरात दिली जाते तेव्हा ती ९०% परिणामकारक ठरते. परंतु या निष्कर्षाना नक्की करण्याएवढा डेटा उपलब्ध होऊ शकलेला नाही. युके आणि कॅनडामध्ये ही लस अनुक्रमे १२ आठवडे आणि १६ आठवडे इतक्या अंतराने दिली जाते. दोन डोस मधील अंतर वाढवल्याचे दुहेरी फायदे आहेत.

पहिला म्हणजे, यामुळे सर्व राज्यांतून सध्या तातडीने केली जाणारी कोविशिल्डची मागणी कमी होईल. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन शिवाय सध्या येऊ घातलेल्या लसींमुळे कोविशिल्डवरील ताण कमी होईल. ज्याचा फायदा संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करण्याच्या धोरणाला होईल.

दुसरा म्हणजे, दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली, तर अधिकारी ज्यांना संरक्षणाची गरज आहे, त्यांना लस देण्याकडे लक्ष पुरवू शकतील. केडीसीए या संस्थेच्या अभ्यासानुसार कोविशिल्डचा एक डोस ६० वर्षांवरील लोकांमध्ये किमान दोन महिन्यांसाठी ८६% परिणामकारक असतो.

हे ही वाचा:

वाझे आणि काझीच्या कोठडीत वाढ

जोधा अकबराचा सेट भस्मसात

‘विरूष्का’कडून कोरोनाबाधितांना दोन कोटींची मदत

उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट होते- संजय काकडे

युके, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या निकालानुसार पहिल्या डोसनंतर २२ दिवसांच्या नंतरही लस घेतलेल्यांना कोणत्याही प्रकारे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही, अशी माहिती ॲस्ट्राझेनेकाने त्यांच्या संकेतस्थळावर दिली होती. लसीच्या वेगवेगळ्या अंतराने घेण्याने मिळणारी परिणामकारकता देखील यावेळी त्यांनी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली होती.

भारताच्या लसीकरणाने मोठा पल्ला गाठला आहे. ६ मे रोजी सकाळपर्यंत सुमारे १६ कोटी २५ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

Exit mobile version