पावसामुळे रेल्वे वाहतूक कोलमडली; चाकरमान्यांचे हाल

मध्य आणि हार्बर रेल्वेला पावसाचा मोठा फटका 

पावसामुळे रेल्वे वाहतूक कोलमडली; चाकरमान्यांचे हाल

मुंबईसह उपनगरात पावसाने मंगळवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय बुधवार, १९ जुलै पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. रात्रीपासूनच मुंबई नजीकच्या उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

या मुसळधार पावसाचा फटका उपनगरीय रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मुंबई लोकलचे वेळापत्रक कोलमडले असून पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक ठप्प आहे. तर मध्य रेल्वेची अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे ठप्प झाल्याने कामाला निघालेला कर्मचारी वर्ग समस्यांचा सामना करत असून पनवेल स्थानकात गर्दी पाहायला मिळत आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतरही अर्धा तास मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. अखेर अर्ध्या तासानंतर रेल्वेने लोकलची सेवा विस्कळीत झाल्याचे जाहीर करण्यात आले. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे उशिराने धावत असून मध्य रेल्वेवरही इतर स्थानकांच्या दरम्यान गाड्या अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत.

हे ही वाचा:

नितीश कुमार यांचा आघाडीच्या ‘इंडिया’ नावावर आक्षेप

जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली

देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यात दोन जणांना घेतलं ताब्यात

किरीट सोमय्या व्हीडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई सुरू

कल्याण, डोंबिवली परिसरात मागील तीन तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असून ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Exit mobile version