इंडी आघाडीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे भारतात नागरिकत्व मागणाऱ्या हिंदू, बौद्ध, शीख किंवा जैन निर्वासितांना न्याय मिळाला नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. अहमदाबादमध्ये अहमदाबादमध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील निर्वासितांना सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
गृहमंत्री शाह म्हणाले, “सीएए केवळ लोकांना नागरिकत्व देण्यासाठी नाही, तर ते लाखो लोकांना न्याय आणि अधिकार देण्यासाठी देखील आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे १९४७ ते २०१४ पर्यंत आश्रय घेणाऱ्या लोकांना न्याय मिळाला नाही. हिंदू, बौद्ध, शीख किंवा जैन असल्यामुळे शेजारच्या देशात त्यांच्यावर अत्याचार झाले. इंडी आघाडीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाने त्यांना न्याय दिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना न्याय दिला.
हेही वाचा..
एआयएमपीएलबी: सेक्युलर सिव्हिल कोड मुस्लिमांना मान्य नाही!
कोलकाता: आरजी कार हॉस्पिटल परिसरात ‘कलम १६३’ लागू !
त्रिपुरामध्ये १६ बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना अटक !
सत्तापालटानंतर बांगलादेश पुन्हा रुळावर, शाळा-महाविद्यालये उघडण्याचे आदेश !
ते म्हणाले, जेव्हा फाळणी झाली तेव्हा दंगली झाल्या. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी हिंदू, शीख, जैन आणि बौद्धांना याचा फटका सहन करावा लागला. अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. या देशांतील निर्वासितांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते, परंतु आपली मतपेढी खूश करण्यासाठी तसे केले नाही. भाजपने २०१४ मध्ये आश्वासन दिले होते की सत्तेवर आल्यास ते सीएए लागू करेल.
जरी २०१९ मध्ये कायदा मंजूर झाला असला तरीही नागरिकत्व देण्यास विलंब झाला कारण अल्पसंख्याकांची दिशाभूल केली गेली. परंतु सीएए कोणाचेही नागरिकत्व काढून घेत नाही. आजही काही राज्य सरकारे लोकांची दिशाभूल करत आहेत. माझ्या राज्यात १२८ कुटुंबे भारताचे नागरिक झाली आहेत. बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा तेथे २७ टक्के हिंदू होते पण आज ते ९ टक्के आहे कारण त्यांना त्यांचा धर्म बदलण्यास भाग पाडण्यात आले होते.
या कार्यक्रमापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी अहमदाबादमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये ऑक्सिजन पार्क आणि झीलचे उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. शहा म्हणाले, “अहमदाबाद महापालिकेने १०० दिवसांत ३० लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. मीही या मोहिमेत सहभागी झालो आहे. अहमदाबादच्या लोकांनीही त्यात सामील व्हावे. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येइतकी झाडे लावू शकतो का ? पर्यावरणातील बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग हे आज मानवासाठी दोन टोकाचे धोके आहेत. पीएम मोदींनी ‘एक पेड माँ के नाम’ आणि आपल्या मातांसह एक झाड लावण्याची हाक दिली आहे. आपण सर्वांनी आपली जबाबदारी समजून एक झाड लावले पाहिजे आणि त्याचे संगोपन केले पाहिजे.