22 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरविशेषनितीन गडकरींच्या कामगिरीमुळे भारताने चीनला टाकले मागे

नितीन गडकरींच्या कामगिरीमुळे भारताने चीनला टाकले मागे

भारतामध्ये जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे रस्त्यांचे जाळे

Google News Follow

Related

जगभरात सर्वांत मोठ्या रस्त्यांच्या जाळ्यांमध्ये भारत आता अमेरिकेच्या पाठोपाठ स्थानापन्न झाला आहे. केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत सुमारे ५४ हजार किमी नव्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे पसरले आहे. भारताने एक लाख ५४ किमी रस्त्यांची निर्मिती करून चीनला मागे टाकत हे दुसरे स्थान पटकावले आहे. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सरकारच्या गेल्या नऊ वर्षांतील विकासकामांचा ऊहापोह करताना ही माहिती दिली. भारताचे रस्त्यांचे जाळे ५९ टक्क्यांनी वाढले आहे.

सद्यस्थितीत भारताचे रस्त्यांचे जाळे सुमारे एक लाख ४५ हजार २४० किमी आहे. तर, आर्थिक वर्ष २०१३-१४मध्ये हे जाळे केवळ ९१ हजार २८७ किमी होते. यामध्ये ४४ हजारांहून अधिक दोन मार्गिकांच्या महामार्गांना चार मार्गिकांमध्ये रूपांतरित केले आहे. गेल्या नऊ वर्षांत चार मार्गिकांच्या राष्ट्रीय महामार्गांची लांबी दुप्पट झाली. सन २०१३-१४मध्ये चार मार्गिकांच्या महामार्गांची लांबी १८ हजार ३७१ किमी होती, जी वाढून ४४ हजार ६५७ किमी. झाली. गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने कितीतरी राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस-वेची निर्मिती केली, अशी माहिती गडकरी यांनी दिली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेला, देशातील सर्वांत लांबीचा दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

हे ही वाचा:

ज्यांचे स्वागत केले त्यांची नियत अचानक कशी ठरली वाईट?

वॅगनरनंतर जगभरातील खासगी लष्करी दलांकडे वळले लक्ष

रोममधील त्या रोमिओला होणार शिक्षा; कोलोझियम वास्तूवर कोरले नाव

अजितदादा पुण्यात तुमचेच वर्चस्व मग गुन्हेगारी का थांबत नाही?

सॅटेलाइटवर आधारित टोल तंत्रज्ञान

सध्या सॅटेलाइटवर आधारित टोल तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. ज्यामध्ये गाडी जितके किमी अंतर महामार्गावर धावेल, तेवढ्या अंतराचा टोल गाडीमालकाला द्यावा लागेल. या तंत्रज्ञानामुळे टोलिंग बुथ ही संकल्पनाच मागे पडेल. तसेच, जम्मू काश्मीर, लडाख आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये दोन लाख कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग बनवले जात असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

वृक्षांचे स्थानांतरण

राष्ट्रीय महामार्ग बनवताना वृक्षतोड करण्याऐवजी ते वृक्ष उखडून त्याचे दुसऱ्या ठिकाणी रोपण केले जात आहे. आतापर्यंत अशा ६८ हजार वृक्षांचे दुसरीकडे रोपण करण्यात आले आहे. महामार्ग बनवताना १५०० अमृत सरोवर म्हणजेच तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच, दिल्ली रिंग रोड तयार करण्यासाठी ३० लाख टन कचऱ्याचा वापर करण्यात आला आहे.

कोणत्या देशात किती किमी. रस्त्यांचे जाळे

अमेरिका ६८ लाख तीन हजार ४७९ किमी.
भारत ६३ लाख ७२ हजार ६१३ किमी.
चीन ५१ लाख ९८ हजार किमी.

एनएचएआयचा विक्रम

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सात जागतिक विक्रम बनवले आहेत. एनएचएआयने याच वर्षी १०० तासांत १०० किमी लांब एक्स्प्रेस वेची निर्मिती केली. हा विक्रम उत्तरप्रदेशमध्ये तयार होत असलेल्या गाजियाबाद-अलीगड एक्स्प्रेसवे दरम्यान केला गेला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १०५ तास आणि ३३ मिनिटांच्या विक्रमी वेळेत महाराष्ट्रातील अमरावती आणि अकोला दरम्यान ७५ किमी. लांब बिटुमिनस काँक्रीटचा रस्ता तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता.

टोलमधून मिळणारे उत्पन्नही वाढले

गेल्या नऊ वर्षांत टोलमधून मिळणारे उत्पन्नही चार हजार ७७९ कोटी रुपयांवरून ४१ हजार ३४२ कोटी रुपये झाले आहे. सन २०३०पर्यंत हेच उत्पन्न १.३० लाख कोटींपर्यंत नेण्याचा सरकारचा मनोदय आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा