27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषनिष्काळजी चालक आणि बेस्टला लाखोंचा भुर्दंड

निष्काळजी चालक आणि बेस्टला लाखोंचा भुर्दंड

बेस्ट चालकांच्या बेसावधगिरीमुळे चार प्रकरणात ६२ लाख रुपयांची नुकसान भरपाई रुग्णांना देण्यात आली.

Google News Follow

Related

आरटीआयच्या अहवालामध्ये बेस्टच्या विरोधात मागच्या महिन्यात मोटार अपघात दावा न्यायाधिकरण कडे एकूण १६९ प्रकरणे प्रलंबित आहेत. चार वेगवेगळ्या घटनामध्ये, बेस्ट उपक्रमाला एकूण ६२ लाख रुपये भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. रेबेका समरवेल सांगतात की, या चार घटनांमध्ये रुग्णांना हात-पाय गमावण्यापासून ते फ्रॅक्चरपर्यंतच्या घटना घडल्या आहेत.

मालाड येथील रहिवासी असलेले असलउद्दीन शेख यांच्या दुचाकीला बेस्ट बसने २०१७ साली मागून धक्का दिला. त्यामुळे त्यांचा उजवा पाय कापावा लागला, म्हणून त्यांना ३६ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले. असलउद्दीन शेख यांनी न्यायप्राधिकरनाला सांगितले की, बेस्ट बस डावीकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना बेस्टच्या निष्काळजीपणाने हा अपघात झाला आहे, असा दावा त्यांनी केला. बेस्टचालकाच्या बेदकारपणे हा अपघात झाल्याचे न्यायाधिकारणाने म्हटले आहे. दावेदार शेख यांनी कायमस्वरूपी ८५ टक्के अपंगत्व आले. शेख हे ऐका खाजगी कंपनीत ८,००० रुपये मासिक पगारावर काम करत होते. त्यामुळे विरुद्ध पक्षास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी बेस्ट प्रशासनाची राहील. असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

दागिने विक्रेत्याने दिली होती मुकेश अंबानींना धमकी

एकाही तालुक्यात दुष्काळी स्थिती नाही म्हणजेच निसर्गही आमच्यासोबत

विरोधकांना गजनीची लागण

मुंबई पोलिसांची भरुचमध्ये मोठी कारवाई, १ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

 

दुसऱ्या एका प्रकरणात अंधेरीचे रहिवासी असलेले अविनाश मंगळे याना २०१६ मध्ये बस चालकाने अती घाईमध्ये बस चालवल्यामुळे मंगळे बसच्या बाहेर फेकले असता त्यांचे दोन्ही पाय जखमी झाले व हातावरून बसचा टायर गेला. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून बेस्ट प्रशासनाला १७ लाख ४० हजार रुपये मंगळे यांना देण्यास सांगितले. अजून एका प्रकरणात डिसेंबर २०१७ मध्ये धारावीची महिला चंदन श्रेयकर बसमधून प्रवास करत असताना भरधाव वेगाने स्पीडब्रेकरवरून बस गेली असता त्या बसमध्ये पडल्यामुळे घोट्याला फ्रॅक्चर झाले. पाय सुन्न झाल्यामुळे त्यांना आसनावरून उठता येत नव्हते, असा दावा श्रेयकर यांनी केला. न्यायाधिकरणाने सर्व वैद्यकीय चाचण्या व पोलीस चौकशी केल्यानंतर बेस्ट प्रशासनास श्रेयकर यांना १ लाख ५१ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली.

दहिसर येथील राजेश्वर येल्ला हा २१ वर्षीय तरुण २०१६ मध्ये बोरिवली पश्चिम येथे रस्ता ओलांडताना बसने धडक दिली. यात तरुणाला अर्धवट अपंगत्व आल्याने ७ लाख १० हजार रुपयांची नुकसान भरपाई म्हणून बेस्ट प्रशासना कडून देण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा