25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषटाळेबंदीला कंटाळून व्यावसायिकाने केला आत्मघात

टाळेबंदीला कंटाळून व्यावसायिकाने केला आत्मघात

Google News Follow

Related

टाळेबंदीला कंटाळून महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार भागातील एका हॉटेलमध्ये व्यावसायिकाने आत्महत्या केली.  ठाकरे सरकारच्या जाचक निर्बंधांमुळे आणि निर्णय न घेण्याच्या क्षमतेमुळे महाराष्ट्रातील जनता आता आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. करुणाकरण बी पुत्रण असे मृताचे नाव असून, ते ४८ वर्षांचे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली.

करुणाकरण हॉटेलच्या एका खोलीत छताच्या पंख्याला लटकलेले आढळले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्याकडून एक चिठ्ठी सापडलेली आहे. या चिठ्ठीमध्ये लॉकडाऊनमधून उद्भवलेल्या त्यांच्या भीषण आर्थिक परिस्थितीचा उल्लेख केलेला होता. चिठ्ठीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून हॉटेल चालत नसल्याने आर्थिक तंगी निर्माण झाली होती. हॉटेल मालकाचे भाडे थकले होते. लाईट बिल भरायला पैसे नव्हते, कामगारांचा पगार निघत नव्हता. हॉटेल मालक भाड्यासाठी तगादा लावत होते. या सर्व आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्या करत आहे’, अशा आशयाचे पत्र लिहिले असल्याची कुजबूज ग्रामस्थांमध्ये आहे.

पुत्रन यांना दोन लहान मुले असून या मुलांना वडिलांचे छत्र गमवावे लागले. परंतु पुत्रण यांच्या पत्नीने असा आरोप केला की, मालमत्तेचे प्रलंबित भाडे भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. सध्या विरार येथील अर्नाळा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यू नोंदविला आहे.

हे ही वाचा:

बालिका वधूच्या ‘दादी सा’ चे निधन

बापरे! पनीरमध्ये दुधाऐवजी खाद्यतेल

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू?

कल्याण डोंबिवलीमध्ये बेकायदा बांधकामांचे पीक

गेले दीड वर्षे महाराष्ट्रातील टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय बुडाले. केवळ इतकेच नाही तर, निर्बंधजाचामुळे व्यापारी अक्षरशः हवालदिल झालेले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या नावाने ठाकरे सरकारने सर्वच क्षेत्रात वाट लावलेली आहे. शिक्षण क्षेत्रातही फारशी चांगली स्थिती नसल्याने, काही दिवसांपूर्वी स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली. त्यानंतर आता या व्यावसायिकाची आत्महत्या झालेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा