उत्तर प्रदेशातील बरेली येथे नुकत्याच झालेल्या एका लग्न समारंभात बिर्याणीतील चिकन लेगचे तुकडे मिळाले नाहीत म्हणून ऐन लग्न मंडपात राडा झाला. हा प्रकार जेव्हा वराच्या बाजूच्या पाहुण्यांच्या लक्षात आल्यावर हा गोंधळ सुरु झाला. नंतर याचे रुपांतर मारामारीत झाले.
याचा एक व्हीडीओ समाजमाध्यमात प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे एकमेकाना लाथा मारत आहेत, खुर्च्या फेकत आहेत असे दिसून येते. विशेष म्हणजे या सगळ्या राड्यात वराती सुद्धा सामील झाले होते. लग्नातील दोन्ही कुटुंबे एकमेकाना भीडल्याचे चित्रीकरण करून कोणीतरी हा व्ह्डीओ समाजमाध्यमात व्हायरल केला.
हेही वाचा..
“आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसला राज्यघटनेवर प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार नाही”
ड्रग्स सेवन करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात!
मध्य प्रदेश; भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना भोपाळमधून अटक!
पुण्यात ड्रग्ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर फिरवणार; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश
या सगळ्या भांडणाबद्दलचे थेट चित्रीकरणाच समाज माध्यमात व्हायरल झाले असले तरी या बद्दलची कोणतीही पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. याबद्दल स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, त्यांना या घटनेची माहिती आहे आणि औपचारिक तक्रार दाखल केल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.