जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीसंबंधित एक महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांना रक्ताचा कर्करोग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी माहिती प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी दिली आहे.
प्रकाश आमटे हे सध्या ७४ वर्षाचे असून ते सुप्रसिद्ध बाबा आमटे यांचे पुत्र आहेत. न्युमोनियाची लागण झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून त्यांना ताप येत असल्याने पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनिकेत आमटे यांनी फेसबुक वरून याची माहिती दिली आहे. डॉक्टर प्रकाश आमटे हे ८ जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले होते. त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत. त्यांना डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. कदाचित त्यांना Lukemia झाल्याची शक्यता आहे. त्या साठी पुढील तपासण्या सुरू आहेत, अशी फेसबुकवर अनिकेत आमटे यांनी पोस्ट करून माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
भारतातील वेबसाईट्सवर हॅकर्सचा हल्ला
अमेझॉनला ‘या’ प्रकरणात दोनशे कोटींचा दंड
मोदी सरकार १० लाख नोकऱ्या देणार
नुपूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या
डिसेंबर १९७३ पासून प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे हे समाजसेवा करत आहेत. हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात. तसेच जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात. प्रकाश आमटे यांना २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने मिळाला आहे. तर २००८ मध्ये त्यांना पत्नी मंदाकिनी यांच्यासहन रेमन मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. प्रकाशवाटा, रानमित्र यासारख्या पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलं आहे.