राज्यामध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे चांगलेच नुकसान झालेले आहे. शेतकरी वर्ग या पावसामुळे चांगलाच हतबल झालेला आहे. हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. या पावसामुळे ३५ ते ४० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याचा आता सध्याच्या घडीला प्राथमिक अंदाज आहे. गुलाब या चक्रीवादळामुळे अक्षरशः होत्याचे नव्हते झालेले आहे.
औरगांबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अजूनही पूरपरिस्थिती कायम आहे. अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे. त्यामुळेच एकट्या मराठवाड्यात या पावसाने २५ जणांना प्राण गमवावा लागलेला आहे. रस्त्यांचेही या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. १२०० पूर वाहून गेले आहेत. पुरामुळे ११० गावांचा संपर्कही तुटला आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात सरारीपेक्षा तिप्पटी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जून ते आजपर्यंत जिल्ह्यात अकरा वेळा अतिवृष्टी झाली आहे, तर मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात तीनवेळा ढगफुटी सदृश परिस्थीती आहे आणि पावसाचा जोर अद्यापही विसावलेला नाही.
जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ९७३ मी.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वदूर कोसळलेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मांजरा, वाण, सिंदफना, बिंदुसरा, कुंडलिका आदी सर्व प्रमुख नद्यांना पूर आला आहे. तसेच मोठे जलप्रकल्प तुडुंब भरल्याने त्यांचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यामुळे पुढील गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. बीड जिल्ह्यातील मांजरा नदी काठच्या सुमारे २४ गावांमध्ये पाणी शिरले असून काही गावांमधील लोकांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
आरोग्य विभाग परीक्षेचे काम ‘त्या’ न्यासाकडेच! परीक्षेनंतर म्हणे दंड ठोठावणार
सोशल मीडियावर खड्डाखडी; नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली
तुम्ही संपूर्ण शहराला बंदिस्त केले आहे
महाराष्ट्र मॉडेलमध्ये कोविड योद्धे संपावर
पुरात अडकून घरावर, झाडावर आधार घेतलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील दोन गावातील ७७ नागरिकांना सुखरूप वाचविण्यात बचाव पथकांना यश आले, मात्र खूप मोठ्या प्रमाणावर पशुहानी झाली आहे. जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, बीड, वडवणी, धारूर यांसह पाटोदा आदी जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अतोनात नुकसान व घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात या दोन महिन्यात पुराच्या पाण्यात वाहून जाऊन १४ जणांचे प्राण गेले आहेत.