गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र याठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे. पुढील ४८ तास या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीम्सही रवाना झालेल्या आहेत.
मुंबई, ठाणे, विदर्भ, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातही पावसाचा फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. हा इशारा पुढील काही तासांसाठी देण्यात आला असून त्यातील पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या ५ जिल्ह्यांना रेड अलर्ड देण्यात आला आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेड या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. विदर्भात तर पुराच्या पाण्यात बस घातल्याने ती वाहून गेल्याची घटनाही घडली.
बीड जिल्ह्यातील मांजरा नदीला पूर आला असून नदीकाठावरील वाकडी गावात पाणी शिरले. त्यामुळे गावकऱ्यांना घराच्या छतावर जाण्याची वेळ आली. मांजरा धरणाचे दरवाजेही आता उघडण्यात आलेले आहेत.
औरंगाबादमधील शिवना टाकळी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. शिवना नदीला पूर आल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’
…म्हणून डॉक्टरांनी एका दिवसात केले ६७ गर्भपात!
दिल्ली उच्च न्यायालय म्हणते, दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ओढ्यांना पूर आला आहे. गावात पाणी शिरले आहेत तर नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबईत तर उपनगरांसह शहरी भागातही जोरदार वृष्टी होत आहे.