ब्राह्मण म्हणून लक्ष्य केल्याने शालेय आहार बनविण्यास दिला नकार

केरळमधील घटना, डाव्यांचे कारस्थान असल्याचा आरोप

ब्राह्मण म्हणून लक्ष्य केल्याने शालेय आहार बनविण्यास दिला नकार

शाळांच्या महोत्सवांना अन्नपदार्थ पुरविणारे केरळमधील प्रसिद्ध शेफ नंबुद्री यांनी यापुढे शालेय महोत्सवांना अन्नपदार्थ पुरविण्यासाठी निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचे ठरविले आहे. कारण आहे, ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या महोत्सवांत मांसाहार देण्यात यावा अशी अनेकांची मागणी आहे. पण नंबुद्री हे शाकाहारी आहारासाठी आग्रही असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र नंबुद्री यांनी हे आऱोप फेटाळून लावत यापुढे महोत्सवांच्या आहारासाठी निविदा भरणार नसल्याचे म्हटले आहे.

नंबुद्री यांनी म्हटले आहे की, शाळांच्या महोत्सवात शाकाहारी आहार पुरविल्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. ब्राह्मण असल्यामुळे ते शाकाहारी आहार देत आहेत, मांसाहारी आहाराला त्यांचा विरोध आहे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. खरे तर गेली १६ वर्षे नंबुद्री हे आहार पुरवत आहेत. आतापर्यंत २ कोटी मुलांना त्यांनी आहार पुरविला आहे.

ते म्हणतात की, शालेय महोत्सवात आहार पुरविणे ही माझी ओळख आहे. पण आता माझ्यावर जातीय आरोप केले जात आहेत. त्यामुळे मी हे काम यापुढे करणार नाही.

हे ही वाचा:

मुश्रीफांचा नंबर लागला आता अस्लम शेख

मागचं सरकार फ़ेसबुकवरती होतं, पण जनतेत मृत होतं

विशिष्ट जातीधर्माच्या लोकांवर कारवाई केली जात आहे…मुश्रीफांचा गंभीर आरोप

बच्चू कडू यांना मोटरसायकलची धडक

नंबुद्री म्हणाले की, मासांहारी आहार तोही दर्जेदार, पौष्टिक असेल असा पुरविणे आव्हानात्मक असते. या महोत्सवात ९ हजार विद्यार्थी असतात आणि एकूण २४ हजार लोकांना हे जेवण पुरविले जाते. आपण ऍथलेटिक्स आणि क्रीडा स्पर्धांना मांसाहारी आहार पुरवितो. पण ते वगळता आपण मांसाहारी आहारासाठी कोणतेही कंत्राट घेत नाही. पण आपण मांसाहारी आहार पुरविण्यास कधीही नकार दिलेला नाही. मात्र सरकारने महोत्सवासाठी शाकाहारी जेवण पुरविण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आपण तसे जेवण पुरविले. आपली जात पाहून आपण मांसाहारी जेवणाला कधी विरोध केलेला नाही.मात्र आता आपल्या जातीवरून संशय व्यक्त केल्यामुळे यापुढे या महोत्सवासाठी आहार पुरविण्याची कोणतीही निविदा आपण स्वीकारणार नाही. डाव्यांचे हे कारस्थान असल्याचाही आरोप नंबुद्री यांनी केला आहे.

४ जानेवारीला टीव्ही न्यूज अँकर आणि केरळ विद्यापीठातील प्रोफेसर अरुण कुमार यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत शालेय महोत्सवात शाकाहारी जेवण पुरविले जात असल्याबद्दल टीका केली होती. आहार बनविणारे नंबुद्री हे ब्राह्मण असल्यामुळे शाकाहारी जेवण पुरविले जात आहे. अनेक विद्यार्थी हे मांसाहार करणारे असले तरी त्यांना शाकाहारी जेवण दिले जात आहे.

Exit mobile version