25 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषलोकलबंदीमुळे बेस्टने उचलला प्रवाशांचा भार

लोकलबंदीमुळे बेस्टने उचलला प्रवाशांचा भार

Google News Follow

Related

राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातील निर्बंधांतून सुट देण्यात आली आहे. परंतु तरीही मुंबईतील सर्व सामान्यांना लोकल प्रवासाची सुट देण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी प्रवाशांकडून बेस्टचा वापर करण्यात आल्याने बेस्टवर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना अद्याप लोकलमुभा मिळाली नसल्याने बेस्ट उपक्रमावर निर्माण झालेला ताण अजूनही कायम आहे. प्रवाशांची संख्या, बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील बस आणि त्यांच्या फेऱ्या यांचे प्रमाण व्यस्त आहे. बसप्रवाशांची संख्या मात्र निर्बंधांत सूट दिल्याने, शिवाय कार्यालयात संपूर्ण उपस्थितीस परवानगी दिल्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे बस थांब्यांवरदेखील प्रचंड गर्दी होत आहे.

हे ही वाचा:

नव्या युतीच्या फुसकुल्या

कळवा येथे घरांवर कोसळली दरड

जम्मू- काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएची छापेमारी

धक्कादायक! गर्भपिशव्या काढण्याचा इथे सुरू आहे धंदा

करोनाकाळात मुंबईतील सार्वजनिक वाहतूकसेवेचा भार हा बेस्ट सेवेवर आला आहे. लोकलसेवा मर्यादित प्रमाणात असल्याने बेस्टवर अवलंबून असलेल्यांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी मार्चपासून मुंबईकरांना प्रामुख्याने बेस्टचीच सेवा उपलब्ध आहे. मात्र बेस्टने प्रवासीभिमुख सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे, असे ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ उपक्रमाचे म्हणणे आहे. बेस्टमध्ये भाडेतत्त्वावर बस घेण्यात येत असून त्या बसची आसनक्षमता ३० प्रवाशांची आहे. त्या मानाने बेस्टच्या मोठ्या आकाराच्या बसची प्रवासीक्षमता दुपटीने अधिक म्हणजे ७२ आहे, असे ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ने म्हटले आहे.

बेस्टच्या १ लाख प्रवाशांसाठी बसच्या ५० आसनक्षमतेचा विचार केल्यास एकूण ६,२६८ बसची आवश्यकता भासणार आहे. परंतु सध्या बेस्टच्या स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वारील बससंख्या ३,२६७ आहे. त्यामुळे, मुंबईतील बेस्ट सेवेवरील ताण अधिकाधिक वाढत चालला आहे. त्यामुळे, बेस्ट उपक्रमात २०११-२०१२ मध्ये असलेल्या मोठ्या आकाराच्या ४,३८५ संख्येप्रमाणेच बसताफा वाढवावा, अशी मागणी ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ने केली आहे.

राज्य सरकार व पालिकेने कार्यालये, दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास अनुमती दिली आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांना अद्याप लोकलमुभा नसल्याने हजारो मुंबईकरांना बेस्टवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे बसथांब्यांवर गर्दी होत आहे. बसमधील गर्दीमुळे करोनासंबंधी सुरक्षानियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा