बांगलादेशातील ढाका विद्यापीठातील हिंदू विद्यार्थ्यांकडून काल (२० मार्च) निदर्शने करण्यात आली. विद्यापीठातील मुस्लीम विद्यार्थ्याकडून हिंदू देव-देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हिंदू विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्याला विद्यापीठातून काढून टाकण्याची आणि कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये विद्यापीठातील हिंदू मुले आणि मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
गुरुवारी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास एका निषेध रॅली काढण्यात आली. ‘बांगलादेश युनायटेड सनातनी जागरण आघाडी’नेही त्याच ठिकाणी याच मागण्यांसह असाच कार्यक्रम बोलावला होता. या प्रकरणात आरोपी मोहम्मद अबू सय्यम असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तक्रारीनुसार, तो हिंदू धर्माबद्दल सतत अपमानास्पद टिप्पण्या करत आहे, ज्यामुळे विद्यापीठ आणि बांगलादेशातील हिंदू समुदाय नाराज आहे.
काही निदर्शकांनी आपला संताप व्यक्त केला, ते म्हणाले की त्यांनाही धार्मिक मूल्ये आहेत आणि प्रश्न उपस्थित केला कि अल्पसंख्याक धर्मांचे अपमान होत असताना पावले का उचलली जात नाहीत. यावेळी निदर्शकांनी सोशल मीडियावर हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षा करण्याची मागणी केली.
हे ही वाचा :
आयपीएल २०२५ : केकेआर आणि आरसीबीचा उद्घाटन सामना रद्द होणार?
विधारा: एक चमत्कारी औषध, अनेक आजारांवर प्रभावी
मायग्रेनपासून मुक्ती देणारे ‘स्वर्गीय झाड’
चेन्नई सुपर किंग्सची ताकद, कमजोरी आणि रणनीती
दरम्यान, हिंदू विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी गुरुवारी एक ‘तथ्य शोध समिती स्थापन’ करण्यात आली. या समितीमध्ये काही सदस्यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करेल आणि कुलगुरूंना निरीक्षणे आणि शिफारसी देईल. डॉ. शांतू बरुआ यांनी ढाका ट्रिब्यूनला सांगितले की ही समिती आरोपांची चौकशी करेल आणि नंतर विद्यापीठ प्रशासन आरोपींना काढून टाकायचे की नाही याचा निर्णय घेईल. तथापि, आरोपी विद्यार्थ्याने यापूर्वीच सोशल मीडियावर माफी मागितली आहे.