१०० कोटींचा अमली पदार्थांचा माल जप्त

गोव्याला डिसेंबर मध्ये होणाऱ्या 'कार्निव्हल' साठी परदेशातून आलेले अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

१०० कोटींचा अमली पदार्थांचा माल जप्त

गोव्याला डिसेंबर मध्ये होणाऱ्या ‘कार्निव्हल’ साठी परदेशातून आलेले अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ह्या महिन्याभरात तब्बल ४८ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत ज्याचा संबंध प्रामुख्याने गोव्याचा आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) व महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ह्यांनी १०० कोटी रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा नुकताच जप्त केला आहे. त्या प्रकरणावर चौकशी केली गेली. चौकशीनंतर हा साठा मुंबई विमानतळाहुन आणल्याची बातमी समोर अली आहे. हे पदार्थ तस्करी करून किंवा दलालांकडून मागवले जातात. नव वर्ष साजरी करण्यासाठी अनेक पार्ट्या केल्या जातात. गोवा हा डिसेंबर मध्ये ‘कार्निव्हल’ साठी प्रसिद्ध आहे. ह्या काळात जगाच्या वेगवेगळ्या देशातून पर्यटक गोव्याला येतात. ह्या पार्ट्यांमध्ये हे अमली पदार्थ छुप्या पद्धतीने घेतले जातात. म्हणूनच परदेशी पर्यटकांसाठी हे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणाने मागवले जात आहेत. ह्या पदार्थांची तस्करी वाढल्याने तपास संस्था त्यावर बारकाईने नजर ठेवून आहे.

हे ही वाचा : 

सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक

नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका

शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार

राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब

गोव्यात येणारे हे अमली पदार्थ आफ्रिकेतून येण्याची शक्यता आहे. आफ्रिकेत अमली पदार्थांचे मोठे जाळे आहे. तिथून अमली पदार्थ हे हस्तकांद्वारे मुंबईत आणले जातात. ह्या हस्तकांची दलालांशी चांगली ओळख पारख असल्याने हे पदार्थ दलालांच्या हातात देतात. परदेशी पर्यटक ह्याच दलालांना पदार्थांची ऑर्डर देतात आणि ऑर्डरच्या हिशोबाने त्याच्या पर्यंत हा माल पोहोचवला जातो. ही प्रक्रिया लक्षात घेऊन तपास संस्था त्यांचे काम करत आहेत. संस्थेने त्यांचे गुप्त माहिती देणारे सूत्र सगळीकडे पसरवले आहेत. ह्याच सूत्रांच्या आधारे संस्था अजूनही माल जप्त करत आहेत

Exit mobile version