केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पुढाकारातून उत्पादन, ७००० रुपयांचा डोस १२०० रुपयांत
भारताच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस या औषध निर्मात्या संस्थेला म्युकरमायकोसिसवरील ‘अँफोटेरिसिन बी’ या इंजेक्शनची निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. हे औषध म्युकरमायकॉसिसवर लागू पडते. महाराष्ट्रात सध्या कोविड पाठोपाठ हा आजार देखील फोफावू लागलेला असताना ही दिलासादायक बातमी समोर आली आहे.
या प्रकल्पाचे नेतृत्व नागपूरचे खासदार आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
हे ही वाचा:
रवी पुजारीच्या अटकेनंतर सुरेश पुजारीच्या कारवाया सुरू?
रा.स्व.संघाच्या गणवेशाने माविआ मंत्र्यांना कळा
पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र
कोवॅक्सिनचे उत्पादन १० कोटी डोस प्रतिमहिना पर्यंत वाढवणार
वर्ध्यातील कारखान्यामधून ‘अँफोटेरिसीन बी’च्या निर्मितीला येत्या पंधरा दिवसात सुरूवात होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यालयाने ट्वीट देखील केले आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरून वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसला कोरोना काळात पसरणाऱ्या काळ्या बुरशीच्या (म्युकरमायकॉसिस) आजारावर वापरल्या जाणाऱ्या अँफोटेरिसिनबी इंजेक्शनच्या निर्मितीला अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र यांच्याकडून परवानगी प्राप्त झाली आहे. १५ दिवसांत याचे उत्पादन सुरू होईल.
यानंतर लगेचच दुसरे ट्वीट आहे ज्यात त्यांनी या औषधाच्या किंमतीबाबत भाष्य केले आहे.
सध्या या कंटेटच्या इंजेक्शनची किंमत सात हजार रुपये आहे आणि किमान चाळीस ते पन्नास इंजेक्शन एका रुग्णाला दिली जातात ज्यामुळे ते लोकांना सहजासहजी प्राप्त होत नाहीये. वर्ध्यात तयार होणारे इंजेक्शन बाराशे रुपयांना उपलब्ध असेल. जेनेटिक लाईफ सायन्समध्ये प्रतिदिन वीस हजार इंजेक्शन तयार होतील.
अभी इस कंटेंट वाले एक इंजेक्शन की कीमत सात हजार रुपये है और करीब चालीस से पचास इंजेक्शन एक मरीज को दिये जा रहे है जिस वजह से लोगों को आसानी से मिल नही रहा। वर्धा में बना यह इंजेक्शन 1200 रुपए में मिलेगा । प्रति दिन बीस हजार इंजेक्शन जेनेटिक लाइफ सायन्सेस में तैयार होंगे।
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) May 14, 2021
कोविडच्या पाठोपाठ महाराष्ट्रात या आजाराने देखील डोके वर काढले आहे. दोन हजारच्या वर रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. हा बुरशीजन्य आजार असल्याने यावरील उपचार महाग असतात. त्याशिवाय यावरील उपचारही बराच चालणारे असतात. म्युकरमायकॉसिसपासून वाचण्यसाठी हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे कोविडपासून बचावाचे जे उपाय आहेत, तेच पाळावे लागतात. या आजाराची सुरूवात नाकापासून होते आणि मग हा तोंड, जबडा येथे पसरतो. हा आजार एकदा फुप्फुसे किंवा मेंदूत पोहोचला की अत्यंत प्राणघातक ठरतो. त्यामुळे हा आजार होऊ न देणे हेच सर्वोत्तम ठरणारे आहे. सध्या महाराष्ट्रात या आजाराचे रुग्ण वाढल्याने या आजारावर वापरल्या जाणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आता या औषध उत्पादन कारखान्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.