कोरड्या मराठवाड्याने तेलंगणाला दिले ५०९ टीएमसी पाणी!

कोरड्या मराठवाड्याने तेलंगणाला दिले ५०९ टीएमसी पाणी!

दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असणाऱ्या मराठवाड्याला यंदा पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसाळ्यात मराठवाड्यातील धरणांमधून ५०९ टीएमसी इतके पाणी तेलंगाणा राज्याच्या दिशेने सोडले आहे, अशी माहिती गोदावरी मराठवाडा पटबंधारे विकास महामंडळाच्या (जीएमआयडीसी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी (७ ऑक्टोबर) दिली.

आतापर्यंत सोडण्यात आलेला हा विक्रमी पाणीसाठा आहे. तेलंगणा राज्यात सोडण्यात आलेले पाणी हे जायकवाडी धारणाच्या क्षमतेच्या सहा पट आणि मराठवाड्यातील इतर धरणांच्या एकत्रित साठवणूक क्षमतेच्या दुप्पट आहे. जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठे धरण आहे. नांदेडमधील बाभळी धरणामधून ४८३.९ टीएमसी पाणी १ जून पासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये सोडण्यात येत होते. विष्णूपुरी धरण, येलदरी धरण, सिद्धेश्वर धरण, लोअर दुधणा धरण, जायकवाडी धरण या धरणांमधून सोडलेले पाणी बाभळी मार्गे तेलंगणामध्ये जाते. सप्टेंबरमध्ये या भागात पडलेल्या विक्रमी पावसामुळे या धरणांमधून पाणी सोडावे लागले होते. काही धरणांमधून अजूनही पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती जीएमआयडीसीचे एस के सब्बीनवार यांनी सांगितली.

हे ही वाचा:

रस्त्याच्या कामांसाठीची महापालिकेच्या फेरनिविदा

उष्णता वाढलेल्या शहरांच्या यादीत भारताच्या ‘ही’ शहरे पहिल्या दहांत

चीनची पुन्हा आगळीक; तवांग क्षेत्रात केली घुसखोरी

श्रीनगरमधील हिंदू, शीख हत्यांनंतर अमित शहांनी उचलले मोठे पाऊल

मराठवाड्याची तहान भागवणारे मांजरा धरण, लोअर तेरणा आणि इसापूर यामधून सुमारे २५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. जे बाभळी व्यतिरिक्त इतर मार्गे तेलंगाणामध्ये सोडण्यात आल्याचे सब्बीनवार यांनी सांगितले. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एकत्रित मिळून १ जून पासून १,०६६ मिमी पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भाला यावर्षी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. या भागामध्ये पिकांचे, जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version