दुष्काळ नियंत्रण वॅार रुम उभी करणार

दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये याकरिता राज्य सरकारचा निर्णय

दुष्काळ नियंत्रण वॅार रुम उभी करणार

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाने दडी मारलेली असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस न पडल्यामुळे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये याकरता राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. मंत्रालयातील वॅार रुममध्येच दुष्काळ नियंत्रण वॅार रुम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्री वॅार रुममधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस वॅार रुमचा आढावा घेणार आहेत. दुष्काळाच्या उंबरठयावर असेलली गावे, तालुके, जिल्हे, विभाग यांवर यातून नजर ठेवली जाणार आहे. हे भाग वॅार रुमशी जोडले जाणार आहेत. दुष्काळाच्या उंबरठयावर असलेल्या गाव, तालुके, जिल्हे, विभाग यांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.

राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील काही भागात दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे. विशेष अधिकारी नेमून आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानुसार निर्णय घेतले जाणार आहेत.

हे ही वाचा:

२८ फुटी नटराज मूर्तीचा अडीच हजार किमी प्रवास

आशिया चषकावर भारतीय महिला हॉकी संघाने कोरले नाव

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल

अफगाणिस्तानात आता हिजाब व्यवस्थित न घातल्यास महिलांना उद्यानबंदी

राज्यातील पाणी साठा आणि स्त्रोत यांच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने धरणातील पाणी साठ्याचे आरक्षण करण्याचे आदेश दिले होते. यानुसार उपलब्ध पाणी साठा पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक वापराकरता आरक्षित केला जाणार आहे.

Exit mobile version