पवई तलावात आणून टाकला जातोय गणेशविसर्जनातील गाळ

पवई तलावात आणून टाकला जातोय गणेशविसर्जनातील गाळ

पवई तलावाभोवती सायकल ट्रॅकचा मुद्दा सध्याच्या घडीला चांगलेच चर्चिला जात आहे. त्यातच आता नवा वाद आता सुरु झालेला आहे. पवई तलावममध्ये गणपती मुर्ती विसर्जित केलेला गाळ आणून टाकला जात आहे. तसेच ज्या मूर्ती विसर्जन करून पूर्णपणे विरघळल्या नाहीत अशा मूर्ती आता पवई तलावात आणून टाकल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे.

एकीकडे सायकल ट्रॅकचा मुद्दा आता चांगलाच चिघळत चाललेला आहे. त्यात आता भरीस भर म्हणून ही गाळाची समस्या. लोकसत्ता वर्तमानपत्राशी बोलताना एस विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी म्हणाले, दरवर्षी अशाच पद्धतीने पुनः विसर्जन होते. अशा पद्धतीने गाळ आणून टाकल्यामुळे स्थानिक अधिक आक्रमक झालेले आहेत. सजावटीचे साहित्य, विसर्जित गाळ तसेच ताडपत्री अशा वस्तू आता तलावात आणून टाकल्या जात आहेत. स्थानिकांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी या गोष्टींला विरोध केलेला आहे. तलाव संवर्धनाचा मुद्दा सध्याच्या घडीला मुद्दा तापलेला आहे. असे असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धुडकावत गोड्या पाण्याच्या जलस्त्रोतामध्ये मूर्तीचे अवशेष तसेच सजावटीचे सामान टाकल्याने आता संताप व्यक्त होत आहे.

वेटलँड तक्रार निवारण समितीच्या सदस्याने पवई तलावाच्या बाजूने सुरू असलेल्या सायकल ट्रॅकचे काम थांबवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि पर्यावरण मंत्रालयाला पत्र लिहिले होते.या प्रकल्पामुळे तलावाच्या जैवविविधतेचे नुकसान होईल. सध्याच्या घडीला काहीच प्रक्रीया न केलेले सांडपाणी सोडल्यामुळे धोका निर्माण झाला आहे असेही सांगितले होते. परंतु तलावाचे संवर्धन हा मुद्दा मात्र अजूनही पालिकेने म्हणावा तितका गांभीर्याने घेतलेला नाही हे स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा:

नितीन गडकरी यांनी केले महाराष्ट्रातील २२ महामार्गांचे भूमिपूजन

डोंबिवलीतील पीडित तरुणीने दिला जबाब…म्हणाली, मुख्य आरोपी घेत होता पैसे!

४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट

लांबच लांब रांगांचे ठाणे

पवई तलाव वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित भारतीय दलदलीच्या मगरींचे घर आहे. तलाव हा राष्ट्रीय वेटलँड ऍटलसचा भाग आहे आणि मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राष्ट्रीय वेटलँड तलावांचे संरक्षण करावे लागेल. तलावामध्ये वन्यजीवांच्या अनुसूची १ प्रजाती (भारतीय मार्श मगर) यासह मुबलक जैवविविधता आहे.

Exit mobile version