तुळशी विवाह पार पडले की साधारणतः लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होते, अशी समज आहे. पूर्वी लग्न म्हटलं की जोडपे मुहूर्तावर जाऊन लग्नकार्य करत असत. आता मात्र परिस्थितीसह जोडपेही आधुनिक विचारांचे झाले आहेत. लग्नाअगोदर नव्याने येऊ घातलेली पद्धत म्हणजे ‘प्री वेडिंग शूट’ यासाठी वाट्टेल तिथे इच्छित स्थळी जाऊन फोटो शूट करून घेतात. त्यासाठी रंगीबेरंगी फुलांचे गार्डन किंवा समुद्रकिनाऱ्यांची निवड करतात. या फोटोशूटसाठी आधुनिक पद्धतीच्या यंत्रणेमुळे ड्रोन किंवा पॅरा ग्लायडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एयरक्राफ्टच्या या गोष्टींच्या सहाय्याने समाजविघातक कृत्ये होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या विवाहपूर्वीच्या फोटोशूट करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अशातच निसर्गरम्य ठिकाणी जाऊन शूटिंग केली जाते. तसेच येथे शूटिंगसाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडून डहाणूतील चौपाट्या आणि लगतच्या बागांना शूटिंगसाठी प्राधान्य दिले जातं आहे. त्यामुळे इथले फोटोशूट करण्यासाठी ड्रोनचा हमखास वापर होतो. तसेच या भागात येणारे पर्यटकसुद्धा हौशीने ड्रोन उडवतात. ड्रोन उडवण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. परंतु पर्यटक किंवा इव्हेंट मॅनेजमेंट असली कोणत्याही प्रकारची परवानगी घेत नाहीत. सध्या चौपाट्यांवर कोणीही या आणि शूटिंग करा असा सर्रास प्रकार चालू आहे.
हे ही वाचा :
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
त्यामुळे सीमा भागातील किंवा तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणांचे चित्रण करून ते समाजाविघातक कृत्ये करण्यासाठी वापरली जावू शकतात. अशी शाश्वती नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे स्थानिक रहिवाशी व पर्यटक यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक रहिवासी व पर्यटक ड्रोन उड्डाणवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. शिवाय उडणाऱ्या ड्रोनचे नियंत्रण सुटल्यास अपघात होण्याचा धोका आहे.