रोहिंग्यांबाबत म्यानमारमधून पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर आली आहे. देश सोडून बांगलादेशात पळून जाणाऱ्या रोहिंग्यांवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यामध्ये महिला, मुले आणि संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लोक आपल्या प्रियजनांच्या शोधात मृतदेहांचे ढीग उलथा-पालथ करताना दिसत होते. सोमवारी (५ ऑगस्ट) हा ड्रोन हल्ला झाला. या ड्रोन हल्ल्याचा संदर्भ देत साक्षीदार, कार्यकर्ते आणि एका मुत्सद्द्याने सांगितले की, हा हल्ला बांगलादेशच्या सीमेवर झाला. ड्रोनद्वारे लोकांचा पाठलाग करून त्याच्यावर बॉम्ब टाकण्यात आले.
राखीन राज्यातील हा सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे वर्णन करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक गर्भवती महिला आणि तिची २ वर्षांची मुलगी देखील यामध्ये ठार झाली. या हल्ल्यासाठी मिलिशिया आणि म्यानमार लष्कराने एकमेकांवर आरोप केले आहेत. हे लोक बांगलादेश सीमा ओलांडण्यासाठी थांबले असताना त्यांच्यावर ड्रोन हल्ला करण्यात आला. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, हा हल्ला म्यानमारच्या किनारी शहर मंगडॉच्या अगदी बाहेर झाला.
हे ही वाचा..
हरियाणाच्या शाळांमधील विद्यार्थी ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी म्हणणार ‘जय हिंद’
मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाचं आंदोलन ही उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरूवात !
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमक; दोन जवान हुतात्मा !
‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ
रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, चिखलाने भरलेल्या जमिनीवर मृतांचे ढीग विखुरलेले दिसत आहेत आणि त्यांच्याभोवती सुटकेस पडलेले दिसत आहेत. या हल्ल्यात वाचलेल्या तिघांनी सांगितले की, २०० हुन अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला. तर अन्य एक व्यक्तीने सांगितले की, ड्रोन हल्ल्यानंतर ७० हुन अधिक लोकांचे मृतदेह समोर पाहिले आहेत.