राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह आणि पुढे त्यामुळेच घडणारे अपघात या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे अनेक निष्पापांचा बळी जात असून आता सर्वच स्तरांवरून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर आता पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. मद्यपान करून वाहन चालवत असल्यास आता मोठी कारवाई होणार आहे.
पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. पुण्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये १ हजार ६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. मात्र, यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिने रद्द केले जाणार आहे. शिवाय त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर सहा महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार आहे. तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तर त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यास थेट लायसन्स रद्द करण्याची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयाला प्रस्ताव पाठवला आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशात बसची दुधाच्या टँकरला धडक; अपघातात १८ जणांचा मृत्यू
मराठवाड्यासह विदर्भाला ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचा बसला धक्का
तेजस ठाकरे अंबानींच्या कार्यक्रमात नाचले, झाली टीका!
फ्रान्समध्येही टॅक्टिकल वोटींगचा बोलबाला… फ्रेंच खिचडी शिजणार का?
पुण्यात गेल्या काही दिवसात अनेक भीषण अपघात घडले आहेत. यातील अनेक अपघात दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे घडल्याचं समोर आलं आहे. कल्याणीनगरमधील पोर्शे कार चालकाने दोन अभियंताला उडवले होते. दोनच दिवसांपूर्णी एकाने मद्यधुंद अवस्थेत दोन पोलिसांना उडवले होते. पुणे-मुंबई महामार्गावर गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना एका मद्यधुंद चालकाने उडवले होते.