30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषमंत्रिपद आहे तोपर्यंत चालक विरहित गाडी नाही!

मंत्रिपद आहे तोपर्यंत चालक विरहित गाडी नाही!

भारतात चालकविरहित गाड्या आल्या तर ८० लाख चालक बेरोजगार होतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Google News Follow

Related

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात ड्रायव्हरलेस किंवा ऑटोनॉमस कार लॉन्च होणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आयआयएम नागपूर आयोजित ‘झिरो माईल’ या कार्यक्रमादरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “मी जोपर्यंत मंत्री आहे, तोपर्यंत ड्रायव्हरलेस कार भारतात सुरू होऊ देणार नसल्याचे मंत्री गडकरी म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान, नितीन गडकरींनी ऑटोमोबाईल अभियांत्रिकीतील बदलांवर भर दिला, जसे की कारमधील सहा एअरबॅग्जचा समावेश, रस्त्यावरील खड्डे कमी करणे आणि मोटार वाहन कायद्याद्वारे दंड वाढवणे इ. ते म्हणाले, “आम्ही मोटार वाहन कायद्याद्वारे दंड वाढवला आहे, तसेच रस्त्यावर ठीक-ठिकाणी रुग्णवाहिका ठेवल्या आहेत.आम्ही दरवर्षी जनजागृती देखील करतो, ते पुढे म्हणाले.

बिझनेस टुडेच्या एका प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले, ‘मी कधीही ड्रायव्हरविना कार भारतात येऊ देणार नाही कारण अनेक ड्रायव्हर त्यांच्या नोकऱ्या गमावतील आणि मी हे होऊ देणार नाही.’ भारतात टेस्लाचे स्वागत आहे, पण चीनमधील उत्पादन भारतात विक्रीसाठी मान्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, “आम्ही टेस्लाला भारतात येण्याची परवानगी देऊ पण ते चीनमध्ये उत्पादन करून भारतात विकू शकत नाहीत. हे घडणे अशक्य असल्याचे त्यानी सांगितले.

हे ही वाचा:

 ज्ञानवापी मशीद संकुलातील वैज्ञानिक सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर   

एनआयएची राज्यात छापेमारी, एक तरुण ताब्यात!

एनआयएची राज्यात छापेमारी, एक तरुण ताब्यात!

हिंदू मुलाशी प्रेम केले म्हणून मुस्लीम तरुणीची तिच्या भावांकडून हत्या

दरवर्षी ५ लाख अपघात
रस्ते अपघातांबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, देशात दरवर्षी ५ लाख अपघात होतात या अपघातांमुळे जीडीपीच्या ३.८ टक्के नुकसान झाले आहे. या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी ६० टक्के तरुण आहेत, मृत्यूचे प्रमाण १० टक्के आणि अपघातांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे… ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यामध्ये चार मुख्य गोष्टी आहेत, एक ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, दुसरी रोड इंजिनीअरिंग, अंमलबजावणी आणि शिक्षण.

यावर स्पष्टीकरण देताना नितीन गडकरी म्हणाले, “आम्ही ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये खूप सुधारणा केल्या आहेत, आम्ही कारमध्ये सहा एअरबॅग्ज आणल्या आहेत. रस्ते अभियांत्रिकीमध्ये ब्लॅकस्पॉट्स सुधारण्यासाठी बरेच काम केले गेले आहे. अंमलबजावणीमध्ये, आम्ही नवीन मोटार वाहन कायदा आणला आहे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वाढवला आहे. आपत्कालीन सेवा आणि शेवटच्या शिक्षणासाठी रुग्णवाहिका आणि क्रेनची सुविधा दिली जात आहे, आम्ही सातत्याने लोकांना जागरूक करत आहोत. २०३० पूर्वी रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा