32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषअपघातग्रस्त गाडीतून पडलेल्या ऋषभला त्या बसचालकाने वाचविले

अपघातग्रस्त गाडीतून पडलेल्या ऋषभला त्या बसचालकाने वाचविले

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा जीव गंभीर अपघातानंतरही बचावला. पण त्याचा जीव ज्याच्यामुळे वाचला त्याची ओळख आता पटली असून त्याने ऋषभला या संकटातून वाचविले.

दिल्लीतून रुरकी येथे ऋषभ पंत आपल्या मर्सिडिज गाडीतून निघाला होता. भरधाव वेगाने जात असताना त्याने रस्त्याच्या मध्यभागी असलेले रेलिंग तोडले आणि त्याच्या गाडीने पेट घेतला. त्याचवेळी त्याचा रक्षणकर्ता त्याच्या मदतीसाठी धावून आला.

त्याचे असे झाले की, त्याक्षणी एक बस तिथून जात होती. त्या बसचा चालक सुशीलकुमार याने हा अपघात बघितला आणि त्याने तात्काळ बस थांबविली. त्यानेच ऋषभला अँब्युलन्स बोलावून रुग्णालयात दाखल केले. सुशीलने ही कहाणी सांगितली. तो म्हणाला की, जेव्हा मी त्या अपघातग्रस्त गाडीजवळ गेलो तेव्हा ऋषभ पंत रक्ताने माखला होता. त्यालाही माहीत नव्हते की हा अपघात झालेला माणूस कोण आहे. सुशीलकुमारने त्याला नाव विचारल्यावर त्याने आपले नाव ऋषभ पंत असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

नार्वेकरांवरील अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची स्वाक्षरीच नाही

‘…म्हणून आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही!’

कर्तव्य पहिले, अंत्यसंस्कारानंतर पंतप्रधानांनी बंगालला दिली वंदे भारतची भेट

गावापासून लांब आहात. मतदान करायचेय, नो टेन्शन!!!

ऋषभ पंत स्वतःच गाडी चालवत होता. रुरकीला तो निघाला होता. तिथे तो आपल्या आईला भेटणार होता. पण गाडी चालवतानाच त्याचे डोळे मिटले आणि काही कळण्याच्या आत गाडीने रेलिंग तोडले. ऋषभ पंत नंतर म्हणाला की, त्याने गाडीची काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गाडीला आग लागली.

सुशीलकुमार म्हणाला की, मी हरयाणा रोडवेजचा चालक आहे. हरिद्वारहून मी येत होतो. तेव्हा दिल्लीहून एक गाडी येताना दिसली ती ६०-७०च्या वेगाने ती दुभाजकाला धडकली. आपटून ती दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर आली. मला वाटले की आता ही गाडी बसवर आदळणार. पण मी सर्व्हिस लाईनवरून गाडी फर्स्ट लाइनवर टाकली. ती गाडी सेकंड लाईनला गेली. त्या गाडीतून एक इसम बाहेर आलेला दिसला. तो मेला आहे असेच मला वाटले. मी विचारले की आणखी कुणी गाडीत आहे का, तर तो म्हणाला नाही. त्याने आपण ऋषभ पंत असल्याचे सांगितले. मला त्याची ओळख काही पटली नाही. कारण मला क्रिकेटबद्दल काही माहीत नाही. त्याच्या शरीरावर कपडे नव्हते. तेव्हा मी त्याच्या शरीरावर चादर घातली. त्याच्याकडील ७ ते ८ हजार रुपयेही तिथे पडले होते. ते आम्ही त्याला दिले. मी अँब्युलन्सला फोन केला आणि ती १५-२० मिनिटांत आली. त्याला रुग्णालयात पाठवले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा