देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्याबरोबरच देशात लसीकरण मोहिम देखील वेगाने चालू आहे. मुंबईत काही ठिकाणी ड्राईव्ह इन लसीकरण वेगाने चालू आहे. मुंबईतील ड्राईव्ह इन लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील त्यांच्या मतदारसंघात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र स्थापन केले आहे.
हे ही वाचा:
आता कोविड चाचणी घरच्या घरीही शक्य
रुग्णाच्या मृत्यनंतरही ३ दिवस उपचार सुरु, नांदेडमधील धक्कादायक प्रकार
ठाकरे सरकारची ‘सोशल’ असहिष्णुता
राजीव सातव यांच्या शोकसभेतही राहुल गांधी यांची पप्पूगिरी
भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या कांदिवली पूर्व मतदार संघातील ग्रोवेल्स मॉलमध्ये अशा प्रकारचे लसीकरण केंद्र चालू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते झाले होते. अतुल भातखळकरांनी याबाबत ट्वीटरवरून या केंद्राची माहिती लोकांना दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे,
कांदिवली पूर्व मतदार संघातील ग्रोवेल्स मॉलमध्ये माझ्या प्रयत्नाने सुरू झालेल्या ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे उदघाटन आज महापौर किशोरी पेडणेकर, खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक रहिवाशांची यामुळे चांगली सोय झाली आहे.
कांदिवली पूर्व मतदार संघातील ग्रोवेल्स मॉलमध्ये माझ्या प्रयत्नाने सुरू झालेल्या ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे उदघाटन आज महापौर किशोरी पेडणेकर, खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक रहिवाशांची यामुळे चांगली सोय झाली आहे. pic.twitter.com/VdFUTKXbJR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 20, 2021
मुंबईत कोविडचा हॉटस्पॉट निर्माण झाला होता. त्यामुळे मुंबईतील लसीकरणाला वेग देण्यासाठी वेगवेगळे पर्याय चाचपडून पाहिले जात आहेत. ड्राईव्ह लसीकरणाला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने इतर ठिकाणी देखील ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रं स्थापन केली होती. आता मुंबईच्या उपनगरात आणखी एक ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहे.