नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा बना,म्हणजेच उद्योजक बनण्याची स्वप्न पहा असे प्रतिपादन रश्मी भातखळकर यांनी केले.त्या जयवंत दादा वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा येथे बोलत होत्या.संस्थेच्या वतीने आयोजित युवा दिन,राजमाता जिजाऊ जयंती दिन व बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता व गुणवत्ता असून त्यांनी दादा वाडेकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन उद्योजक बना असे आवाहन भातखळकर यांनी केले. ग्रामीण भागात काही प्रमाणात शिक्षणाच्या बाबतीत कमतरता असतात ही पण विद्यार्थ्यांनी तिथे उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा तक्रारीचा सुर न ठेवता सहकार्याच्या भुमिकेतुन शिक्षण घेत राहिलो तर आपली प्रगती निश्चित आहे असेही भातखळकर म्हणाल्या.रश्मी भातखळकर या केशवशृष्टीच्या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत असतात.
तर प्रमुख वक्ते नितीन आहेर म्हणाले की युवकांनी आत्मविश्वास,जिद्द,चिकाटी, परिश्रम यांच्या जोरावर आपल्या आवडीच्या क्षेत्रात भव्य यश मिळवा. यासाठी त्यांनी धीरूभाईंसह,बिल गेट्स अशा उद्योजकांची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर सादर केली.
तर प्राचार्य रोहन चुंबळे यांनी सांगितले की,मागील दोन वर्षाच्या काळात विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता संस्थेत विविध विविध कामे केली असून विद्यार्थ्यांनी ही यात सहभाग नोंदवला आहे.जन भागीदारीच्या माध्यमातून संस्थेच्या विकासाकरिता विविध कार्यक्रम वर्षभरात संस्था राबवत असून आजचा कार्यक्रम देखील त्याच उद्देशाने घेतलेला आहे.पुढे रोहन चुंबळे म्हणाले की संस्थेत नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी संस्था प्रयत्न करत असून लॅब डेव्हलपमेंट करिता संस्था आणि औद्योगिक आस्थापना यांच्यात सामंजस्य वाढवून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे दर्जेदार नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देता येईल याकरिता संस्था प्रयत्न करत आहे.विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान बद्दल आवड निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचे कार्यक्रम संस्था सातत्याने घेत आहे असेही प्राचार्य रोहन चुंबळे म्हणाले. तर आयटीआय शिक्षणाला आपला आधारस्तंभ बनवून उद्योजक बना असे नितीन पाटील म्हणाले. यावेळी प्रमुख व्याख्याते ऋषिकेश सावंत यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.
हेही वाचा..
१० रुपयांसाठी बस कंडक्टरकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मारहाण!
सोनमर्ग- लडाखला जोडणाऱ्या बोगद्याचे पंतप्रधानांनी केले उदघाटन!
आगीच्या तांडवातून वाचलेल्या पाळीव कुत्र्याला घेऊन तो नाचला!
ग्रूमिंग गँग फाईल्स: ब्रिटनमधील अत्याचार, हत्या, बलात्काराचे भयंकर वास्तव!
यावेळी माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना ट्रॉफी,प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.दरम्यान संस्थेत सांस्कृतिक कार्यक्रम धावणे,गोळा फेक, बुद्धिबळ,चित्रकला ,निबंध ,स्पर्धा,कबड्डी,खो-खो,लंगडी, क्रिकेट या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्था व्यवस्थापन समिती सदस्य रश्मी भातखळकर, प्राचार्य रोहन चुंबळे, परफेक्ट पॅक चे संचालक मिलिंद वाडेकर,बिल्डटेक स्टील सिस्टीम चे संचालक नितीन पाटील, ,गोवर्धन कौशल केंद्रप्रमुख गोसावी आदी उपस्थित होते.