तामिळनाडूतील सालेममधून अशी एक घटना समोर आली आहे की, ती वाचल्यानंतर तुम्हला थोडा आश्चर्याचा धक्का बसेल. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीला एका तरुणाने सत्यात उतरवली आहे. या मुलाने तीन वर्ष एक एक रुपया जमा करून त्याची स्वप्नातील दुचाकी खरेदी केली आहे.
व्ही. भूपती (२९) असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने तीन वर्षांपूर्वी बजाज डॉमिनर ४०० खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यावेळी त्या दुचाकीची किंमत दोन लाख रुपये होती. मात्र त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मात्र त्याला ही दुचाकी इतकी आवडली होती की, त्याने ती खरेदी करण्याचा निर्धारच केला होता. त्यासाठी त्याने एक एक रुपया जमा करायला सुरुवात केली. तीन वर्षात या दुचाकीची किंमत साठ हजाराने वाढली.
Tamil Nadu | A youth in Salem paid Rs 2.6 lakh to buy a bike with Re 1 coins he collected in three years. pic.twitter.com/ayLgBa23Ja
— ANI (@ANI) March 28, 2022
भूपतीने तीन वर्ष एक एक रुपया जमा करून त्याचे दुचाकीचे स्वप्न साकार केले आहे. तीन वर्षांनी त्याने ही जमा केलेली नाणी मोजली आणि दुचाकीच्या रकमेएवढी त्याचाकडे रक्कम जमा झाली. मग तो दुचाकी खरेदीसाठी नाण्यांच्या बदल्यात नोटा घेण्यासाठी तो बँकेत गेला असता बँकेने त्याला यासाठी आगाऊ शुक्ल घेणार असल्याचे सांगितले. मात्र त्याच्याकडे आगाऊ रक्कम नव्हती. मग तो नाण्यांची भलीमोठी बॅग घेऊनच दुचाकी खरेदी करण्यास गेला.
त्याने त्याला हवी असलेली बजाज डॉमिनर ४०० ही दुचाकी घेतली. जेव्हा पैसे भरण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी त्याची नाण्यांनी भरलेली भलीमोठी बॅग बाहेर काढली. हे पाहून शोरूमवाले पण चकित झाले आणि शोरूम ही नाणी घेण्यास नकार दिला असता भूपती नाराज झाला. भूपतीचा संयम आणि त्याची आवडती दुचाकी मिळवण्याचा त्याचा आग्रह पाहून त्याच्या नाण्यांचा व्यवहार करण्याची तयारी शोरूम मालकाने दाखविली.
हे ही वाचा:
दिल्लीहून श्रीनगरला जाणारं विमान खांबाला धडकलं
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची हिजाबच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात धाव
‘अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर उद्धव साहेबांनी विचार करायला हवा’
लवकरच मुंबई होणार शंभर टक्के लसवंत!
शोरूमच्या व्यवस्थापकांनी ही रक्कम पूर्ण मोजली, हे एक एक रुपये मोजण्यासाठी शोरूमला सुमारे दहा तासांचा अवधी लागला. जेव्हा शोरुमचे २ लाख ६० हजार रुपये पूर्ण मोजून झाले तेव्हाच भूपतीच्या स्वाधीन ही दुचाकी केली.