27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषअचीव्हर्सला नमवून ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी विजेती

अचीव्हर्सला नमवून ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी विजेती

एजिस फेडरल इन्शुरन्स कप (१४ वर्षाखालील) क्रिकेट स्पर्धा :

Google News Follow

Related

ओव्हल येथील ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने माहुल येथे आयोजित केलेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या एजिस फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान मिळविला. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघावर ४ विकेट राखून मात केली.

 

अंतिम सामन्यात ७८ चेंडूत १२ चौकारांसह ८९ धावा आणि तीन झेल टिपणारा यश जगताप सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवडसमितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर, एजिस फेडरलचे गिरीश मणी, सेल्लोराप इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पोद्दार, पोलीस अधिकारी केदारी पवार आणि महेंद्र शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी बोलताना वेंगसरकर यांनी छोट्या खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह वाढविला.

 

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाला निर्धारित ४० षटकांत ९ बाद १८२ धावांचीच मजल मारता आली. रिषभ सडके (२५) आणि सुधान सुंदरराज (१९) यांनी ५१ धावांची सलामी दिली तर नंतर प्रणव ऎयंगार (३९) आणि जशमीत सिंग (३७) यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची भागी रचली. ड्रीम ११ वेंगसरकर अकादमीचा पराग शाह (३३/२) , शिवम यादव (२९/३) आणि अथर्व बागवे (१५/२) यांनी टिच्चून गोलंदाजी केली.

 

या आव्हानाचा पाठलाग करताना ड्रीम ११ वेंगसरकर अकादमी संघाने शून्य धावांवरच पहिला बळी गमावला. मात्र त्यानंतर अधिराज साठे (३२) आणि यश जगताप (८९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागी रचून संघाला सावरले. यशने नंतर निलेश मौर्य (२४) यांच्यासह चौथ्या विकेटसाठी आणखी ४६ धावांची भागी रचून ड्रीम ११ चा विजय दृष्टीक्षेपात आणला.

 

संघाची धावसंख्या १५० असताना शतकाकडे वाटचाल करणारा यश व्योमच्या थेट फेकीने धावचीत झाला. त्याने केवळ ७८ चेंडूत १२ चौकारांसह ८९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आणखी दोन विकेटच्या मोबदल्यात ड्रीम ११ वेंगसरकर अकादमीने ३७.४ षटकांत विजयाला गवसणी घातली.

हे ही वाचा:

जेडीयूच्या खासदाराने पंतप्रधान मोदींचे केले कौतुक म्हणाले, ‘मोदी है तो मुमकिन है’!

महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार

‘सीआयडी’ अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन!

राज्यात  ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणीसाठी ३८६ कोटींचा निधी देणार

या स्पर्धेत २०५ धावा, ४ बळी आणि ६ झेल टिपणारा यश जगताप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरला. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून रिषभ सडके आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निषाद परब (दोघेही अचिव्हर्स क्रिकेट अकादमीचे ) यांना गौरविण्यात आले.

 

सदर स्पर्धेत १२ संघांचा सहभाग होता आणि त्यांची चार गटात विभागणी करण्यात अली होती. त्यामुळे प्रत्येक संघाला किमान दोन साखळी सामने खेळण्याची संधी मिळाली. गटातली सर्वोत्तम संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

 

संक्षिप्त धावफलक – अचिव्हर्स क्रिकेट अकादमी – ४० षटकांत ९ बाद १८२ (रिषभ सडके २५, सुदान सुंदरराज १९, प्रणव ऎयंगार ३९, इश्मित सिंग ३७; प्रयाग शाह ३३ धावांत २ बळी, शिवम यादव २९ धावांत ३ बळी, अथर्व बागवे १५ धावांत २ बळी) पराभूत विरुद्ध ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी – ३७.४ षटकांत ६ बाद १८३ (अधिराज साठे ३२, यश जगताप ८९, निलेश मौर्य २४, ऋग्वेद लाड नाबाद १०; प्रणव ऎयंगार७ धावांत २ बळी, ) सामनावीर – यश जगताप

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा