डीआरडीओचे ”मिशन दिव्यस्त्र” यशस्वी, पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन!

'अग्नी- ५' क्षेपणास्त्रामध्ये एमआयआरव्ही तंत्रज्ञानाचा वापर

डीआरडीओचे ”मिशन दिव्यस्त्र” यशस्वी, पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन!

देशातील शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे.मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित ‘अग्नी- ५’ क्षेपणास्त्राची’ पहिली उड्डाण चाचणी सोमवारी (११ मार्च ) यशस्वीरित्या पार पडली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओचे ”मिशन दिव्यस्त्र” यशस्वी झाल्याचे सांगितले.या अतुलनीय कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया ट्विटरवर लिहिले की, ‘मिशन दिव्यस्त्रा’साठी आमच्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांवर आम्हाला अभिमान आहे.

भारताने आज मिशन दिव्यस्त्राची चाचणी घेतली अन ती यशस्वी झाली. मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानासह स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची ही पहिली उड्डाण चाचणी आहे.एमआयआरव्ही तंत्रज्ञानाच्या अंतर्गत एका क्षेपणास्त्रात एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे आणि या शस्त्राद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी लक्षांवर मारा करता येतो.याचे आणखी एक वैशिष्ट्य मध्ये हे क्षेपणास्त्र रस्त्याने कोठेही नेले जाऊ शकते.यापूर्वीच्या अग्नी क्षेपणास्त्रांमध्ये ही सुविधा न्हवती.

हे ही वाचा..

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक

मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!

“उबाठाच्या बाळराजांना सांगणं आहे, जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो”

निवडणूक रोख्यांची माहिती मंगळवारी देण्याचे एसबीआयला निर्देश

या प्रकल्पाच्या संचालिका एक महिला असून या संपूर्ण प्रकल्पात महिलांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.’मिशन दिव्यस्त्र’ च्या यशस्वी चाचणीमुळे भारत एमआयआरव्हीची हि अद्भुत क्षमता असलेल्या निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे.या मोठ्या यशामुळे भारताची ताकद आणखी वाढणार आहे.’अग्नी- ५’ हे पूर्णपणे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे.याची निर्मिती भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने(डीआरडीओ) केली आहे.या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ७ हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे.या क्षेपणास्त्राची पहिली योजना २००७ मध्ये करण्यात आली होती.आतापर्यंत या क्षेपणास्त्रांच्या अनेक यशस्वी चाचण्या झाल्या आहेत.मात्र, सोमवारी एमआयआरव्ही तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आणि ती यशस्वी झाली.त्यामुळे हे क्षेपणास्त्र शत्रूंसाठी अधिक घातक ठरणार आहे.

Exit mobile version