कोविडविरोधात डीआरडीओचे ‘अस्त्र’

कोविडविरोधात डीआरडीओचे ‘अस्त्र’

सध्या संपूर्ण देशात कोरोना फोफावला आहे. त्यामुळे भारतीय आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. अशातच डीआरडीओने एक औषध विकसित केले आहे ज्याचा कोविडच्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे या औषधाच्या आपात्कालिन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने देखील परवानगी दिली आहे.

डीआरडीओच्या ‘इस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स सायन्सेस’ तसंच हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) यांनी एकत्रित येत हे औषध तयार केलंय. या औषधाला सध्या ‘२ डीजी’ (2 deoxy D Glucose) असं नाव देण्यात आलंय. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद स्थित डॉ. रेड्डी लॅबला देण्यात आली आहे.

हे औषध क्लिनिकल ट्रायलमध्ये यशस्वी ठरलं आहे. ज्या रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात आला त्यांची ऑक्सिजनची गरजची या औषधामुळे बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचं आढळून आलं. शिवायल ते लवकरात लवकर आजारातून बरे झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील वैशाख वणव्यावर पावसाच्या सरींचा उतारा

कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका

४६ वर्षांनंतर आणखी एक पारसी खेळाडू टीम इंडियाचा भाग

कोविड रुग्णांना भारतीय बनावटीच्या ‘वायुपुत्रा’ची साथ

या औषधाचा वापर करोना रुग्णांवर करण्यात आल्यानंतर त्यांच्यात इतर करोनाबाधित रुग्णांपेक्षा कमी वेळेत परिणाम दिसून येत आहे. या रुग्णांचा करोना रिपोर्ट फारच कमी वेळेत ‘निगेटिव्ह’ येत आहे. अर्थात ते लवकर बरे होत आहेत.

डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल २०२० मध्ये प्रयोगशाळेत या औषधाचा प्रयोग केला होता. करोना विषाणूचं सक्रमण रोखण्यासाठी हे औषध प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं. याच आधारावर ‘डीसीजीआय’नं मे २०२० मध्ये या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी दिली होती.

२ डीजीऔषध कसं काम करतं?

हे औषध पावडरच्या स्वरुपात मिळतं. रुग्णाला ते पाण्यात मिसळून दिलं जातं. त्यानंतर हे औषध संक्रमित पेशींत जमा होतं. त्यामुळे विषाणूचं संक्रमण रोखण्यात त्याचा उपयोग होतो. या औषधामुळे रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम कमी होऊ शकतो.

२ डीजीच्या ट्रायल

देशभरातील रुग्णालयांत या औषधाची दुसरी ट्रायल पार पडली. ट्रायलसाठी ११ रुग्णालयांतील ११० रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. मे ते ऑक्टोबर याकाळात ही ट्रायल पार पडली.

हे ही वाचा:

पीएम केअर्समधून मिळालेले ६० व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून

नंदुरबारच्या कलेक्टरकडून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही शिका- उच्च न्यायालय

या औषधाच्या चाचणीचा तिसरा टप्पा डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत देशातील २७ रुग्णालयांत पार पडला. यात २२० रुग्णांचा समावेश करण्यात आला. यात ज्या रुग्णांवर ‘२ डीजी’ या औषधाचा वापर करण्यात आला त्यातील ४२ टक्के रुग्णांची ऑक्सिजनवरच अवलंबित्व केवळ तिसऱ्या दिवशी संपुष्टात आलं. ही ट्रायल महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये करण्यात आली.

Exit mobile version