संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज डीआरडीओने विकसित केलेल्या कोरोनावरील औषधाचे लोकार्पण केले. या औषधाची चाचणी घेण्यात आली त्यात टू डीजी हे औषध रुग्णालयात कोरोनामुळे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत झटपट सुधारणा करू शकते. त्यामुळे ऑक्सिजनवर फार कमी अवलंबून राहण्यास हे औषध मदत करू शकते. सरकारच्या मते या औषधामुळे रुग्णाच्या आरटीपीसीआर चाचण्या निगेटिव्ह येण्याची शक्यता वाढते.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात डीआरडीओने या औषधाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू केली. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी हैदराबाद येथील सेल्युलर आणि मोलेक्युलर बायोलॉजीच्या माध्यमातून प्रयोगाला सुरुवात केली. त्यावेळी असे लक्षात आले की टू डीजी रेणू सार्स कोविड २ या विषाणूविरोधात प्रभावी कामगिरी करतात. विषाणूला वाढीला लगाम घालतात. ऑक्टोबर २०२०मध्ये या औषधाची दुसरी चाचणी केली गेली. तेव्हा कोरोना रुग्णांसाठी हे औषध उपयुक्त आहे, हे स्पष्ट होऊ लागले. जवळपास ११० रुग्णांवर त्याची चाचणी घेतली गेली. प्रथम सहा रुग्णालयांत आणि नंतर ११ रुग्णालयात हे औषध वापरले गेले. नंतर डिसेंबर २०२० आणि मार्च २०२१मध्ये या औषधाची तिसरी चाचणी घेतली गेली. त्यावेळी २२० रुग्णांवर ही चाचणी घेण्यात आली. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील कोरोना रुग्णालयात या औषधाची चाचणी घेतली गेली. नियमित उपचारांमुळे कोरोनाचे रुग्ण ज्या कालावधीत बरे होतात, त्यापेक्षा या औषधामुळे अडीच दिवस आधी ते बरे होऊ शकतात, असे स्पष्ट झाले.
क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, कोरोनाबाधित रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना रुग्णांलयात ऑक्सिजनचा वापरही कमी करावा लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने २-डीजी च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत, म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत.
हे ही वाचा:
तौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली
टुकार सरकार सत्तेवर असल्यास, राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणारच
कोरोनामुळे नाही उपासमारीने आधी मरू
अजितदादांच्या मनात बहुजनांविषयी आकस
यशस्वी निकालांच्या आधारे डीसीजीआयने नोव्हेंबर २०२० मध्ये तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना परवानगी दिली. डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू मधील २७ कोविड रुग्णालयात २२० रुग्णांवर तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा सविस्तर डेटा डीसीजीआयकडे सादर करण्यात आला. २-डीजी आर्ममध्ये, रुग्णांचे प्रमाण जास्त प्रमाणात लक्षणानुसार सुधारले गेले आणि एसओसीच्या तुलनेत तिसऱ्या दिवसापर्यंत पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्व (४२% च्या तुलनेत ३१%) कमी झाले जे ऑक्सिजन थेरपी / अवलंबित्व यापासून लवकर सुटका दर्शवते.