25 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषभारतीय हवाई दल घालणार 'आकाश' ला गवसणी

भारतीय हवाई दल घालणार ‘आकाश’ ला गवसणी

Google News Follow

Related

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने नव्या जनरेशनच्या ‘आकाश’ क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. २१ जुलै, २०२१ रोजी या सर्फेस टू एअर अर्थात जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या नव्या जनरेशनच्या आकाश या क्षेपणास्त्राची चाचणी केली. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथून ही चाचणी यशस्वीपणे करण्यात आली. दुपारी सुमारे १२.४५ वाजता सर्व शस्त्रास्त्र प्रणाली जसे की बहुपयोगी रडार, कमांड कंट्रोल अँड कम्युनिकेशन सिस्टीम आणि लाँचर सह ही चाचणी करण्यात आली. या यशस्वी चाचणीमुळे आता हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सहभागी व्हायला सज्ज झाले आहे.

हे ही वाचा:

आमच्यावर किमान ‘ही’ वेळ आलेली नाही, येणारही नाही

मालपेकर यांची सोनसाखळी हिसकावणारा अटकेत

राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोमात

जिन्ना हाऊस म्हणजे फाळणीचे दुःखद स्मृतिस्थळ

हैदराबाद येथील संरक्षण, संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने डीआरडीओ सह ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. आज झालेल्या चाचणीच्या वेळी, भारतीय हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते. फ्लाईट डेटा संकलित करण्यासाठी इलेक्ट्रो ऑप्टीकल ट्रॅकिंग सिस्टिम, रडार आणि टेलिमेट्री सारखे अनेक रेंज स्टेशन्स तैनात करण्यात आले होते. या संपूर्ण क्षेपणास्त्र प्रणालीची कामगिरी अत्यंत अचूक होती, असे संकलित झालेल्या डेटा वरुन स्पष्ट झाले आहे. या चाचणीदरम्यान, शत्रूच्यां हवेतील हल्ल्याला हवेतच निष्प्रभ करण्याची गतिमानता या क्षेपणास्त्रात असल्याचेही सिध्द झाले आहे.

हे नव्या प्रणालीचे आकाश क्षेपणस्त्र भारतीय हवाई दलात समाविष्ट झाल्यावर भारतीय संरक्षण व्यवस्थेची क्षमता कित्येक पटीने वाढवणार आहे. या चाचणीत भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड आणि भारत डायनामिक्स लिमिटेड या उत्पादक संस्थांनीही सहभाग नोंदवला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा