30 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरविशेष'प्रलय' ची दुसरी चाचणीही यशस्वी

‘प्रलय’ ची दुसरी चाचणीही यशस्वी

Google News Follow

Related

गुरुवार, २३ डिसेंबर रोजी भारताने प्रलय या क्षेपणास्त्राची दुसरी यशस्वी चाचणी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी प्रलय क्षेपणास्त्राची ही चाचणी करण्यात आली. या आधी बुधवार, २२ डिसेंबर रोजी या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी करण्यात आली. जी यशस्वी ठरली होती.

प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्थात सर्फेस टू सर्फेस प्रकारातील मिसाईल आहे.संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या (DRDO) मार्फत करण्यात आली आहे. ओरिसा येथील डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी पार पडली. प्रथमच, सलग दोन दिवस बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या सलग दोन उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत. उड्डाण चाचणीने मोहिमेची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली. हे प्रक्षेपण क्षेपणास्त्राच्या दोन्ही प्रकारातील (कॉन्फिगरेशनमधील) प्रणाली सिद्ध करते.

हे ही वाचा:

माजी आयपीएस अधिकारी आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी

उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?

१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत

भारताच्या शत्रूंवर कोसळणार ‘प्रलय’

आजच्या प्रक्षेपणात, ‘प्रलय’क्षेपणास्त्राची अचूकता आणि लक्ष्यभेदी क्षमता सिद्ध करण्यासाठी अधिक वजनासह वेगळ्या श्रेणीसाठी चाचणी घेण्यात आली. या प्रक्षेपणाचे, पूर्व किनारपट्टीवर तैनात इम्पॅक्ट पॉईंटजवळील डाउन रेंज जहाजे, टेलीमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक ट्रॅकिंग सिस्टीमसह सर्व रेंज सेन्सर्स उपकरणांद्वारे निरीक्षण केले गेले. संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह यांनी या सलग यशस्वी उड्डाण चाचणीसाठी डीआरडीओ आणि संबंधित पथकांचे अभिनंदन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा