प्रदीप कुरुलकर त्या पाक एजंटकडे आकर्षित झाले आणि खूप काही सांगून बसले!

'झारा दासगुप्ता' नामक महिलेच्या संपर्कात होते कुरुलकर

प्रदीप कुरुलकर त्या पाक एजंटकडे आकर्षित झाले आणि खूप काही सांगून बसले!

डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याने भारतातील गुत माहिती पाकिस्तानला पुरवल्या संबंधी पोलिसांनी अटक केली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)ही कारवाई केली होती.एटीएसने दाखल केलेल्या आरोप पत्रात, कुरुलकर हे पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हकडे आकर्षित झाले होते तसेच ‘झारा दासगुप्ता’ या नामक महिलेशी वर्गीकृत संरक्षण प्रकल्पांसह भारतीय क्षेपणास्त्र प्रणालींबद्दल गप्पा मारल्या होत्या, असे या आरोप पत्रात नमूद केले आहे.

 

महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) एका प्रयोगशाळेचे संचालक असलेल्या कुरुलकर यांच्याविरुद्ध गेल्या आठवड्यात येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्याला ३ मे रोजी अधिकृत गुपित कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती आणि आता तो न्यायालयीन कोठडीत आहे. कुरुलकर आणि ‘झारा दासगुप्ता’ व्हॉट्सऍप तसेच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

 

‘दासगुप्ता’ नामक महिलेने ब्रिटनमधील सॉफ्टवेअर अभियंता असल्याचा दावा केला आणि कुरुलकरयाच्याशी अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवून मैत्री केली. तपासादरम्यान तिचा आयपी ऍड्रेस पाकिस्तानचा असल्याचे एटीएसने आरोपपत्रात म्हटले आहे. पाकिस्तानी एजंटने ब्राह्मोस लाँचर, ड्रोन, यूसीव्ही, अग्नी क्षेपणास्त्र लाँचर आणि मिलिटरी ब्रिजिंग सिस्टीम यासह इतर गोष्टींबाबत वर्गीकृत आणि संवेदनशील माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, असे त्यात म्हटले आहे.

 

हे ही वाचा:

पंचायत निवडणूक: तृणमूल काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांची हत्या

शरद पवार म्हणाले की, भाजपाशी चर्चा केली होती; पण विचारधारेमुळे पुढे पाऊल टाकले नाही

आशियाई गेम्ससाठी कुस्तीगीरांची निवड चाचणी अजूनही रखडलेली

नीलम गोऱ्हे अंधारेंवर नाराज की उद्धव ठाकरेंवर

“तिच्याकडे आकर्षित झालेल्या कुरुलकरने डीआरडीओची वर्गीकृत आणि संवेदनशील माहिती त्याच्या वैयक्तिक फोनवर संग्रहित केली आणि नंतर ती झारासोबत शेअर केली,” असे आरोपपत्रात म्हटले आहे. त्याने तिच्याशी पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे (SAM), ड्रोन, ब्रह्मोस आणि अग्नी क्षेपणास्त्र लाँचर्स आणि UCV यासह विविध प्रकल्पांबद्दल गप्पा मारल्या. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे जून २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत संपर्कात होते.

त्याच्या क्रियाकलाप संशयास्पद असल्याचे आढळल्यानंतर डीआरडीओने अंतर्गत चौकशी सुरू करण्यापूर्वी, कुरुलकरने फेब्रुवारी २०२३ मध्ये झाराचा नंबर ब्लॉक केला.त्यानंतर कुरुलकर याना दुसऱ्या एका अनोळखी भारतीय नंबरवरून व्हॉट्सऍप मेसेज आला, ‘तू माझा नंबर का ब्लॉक केलास?’ चॅट रेकॉर्ड्समध्ये असेही दिसून आले आहे की, त्याने आपले वैयक्तिक तसेच अधिकृत वेळापत्रक आणि स्थाने तिच्याशी शेअर केली असूनही त्याने ती कोणाशीही शेअर करायची नाही, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

Exit mobile version