डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्यामार्फत संरक्षण तंत्रज्ञान या विषयातला एमटेक हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्यासोबत संयुक्त विद्यमाने ही पदव्युत्तर पदवी सुरू करण्यात आली आहे. याचा उपयोग संरक्षण तंत्रज्ञान या विषयातील भौतिक तसेच प्रयोग स्वरूपाचे ज्ञान आणि कला, क्षमता यांच्या वृद्धीसाठी होणार आहे.
डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी आणि एआयसीटीई चे प्रमुख प्राध्यापक अनिल सहस्रबुद्धे यांनी एका वर्च्युअल कार्यक्रमाद्वारे या नव्या पदवी अभ्यासक्रमाची उद्घाटन केले. एआयसीटीई च्या नवी दिल्ली येथील इमारतीत हा कार्यक्रम पार पडला. ८ जुलै २०२१ रोजी या अभ्यासक्रमाचा लॉन्च करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
नव्या रेल्वे मंत्र्यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय
‘पालिकेतील वजनदार नेत्याच्या आशीर्वादाशिवाय हा भ्रष्टाचार अशक्यच’
रझा अकादमीचा जनाबसेनेला दम…मोहम्मद पैगंबर कायदा आणण्यासाठी दबाव
एआयसीटीईशी संलग्न कोणत्याही संस्था अथवा विश्व विद्यालयातून हा कोर्स करता येणार आहे. तसेच आयआयटी, एनआयटी तसेच इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायन्टिस्ट अँड टेक्नॉलॉजी येथेही हा कोर्स करता येणार आहे. या अभ्यासक्रमात कॉम्बॅट तंत्रज्ञान, हवाई तंत्रज्ञान, नौदलाचे तंत्रज्ञान, कम्युनिकेशन यंत्रणा आणि सेन्सर्स, डायरेक्टेड एनर्जी तंत्रज्ञान, हाय एनर्जी मटेरियल्स तंत्रज्ञान यांचा समावेश करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे मुख्य प्रबंधाशी संबंधित काम हे डीआरडीओच्या प्रयोगशाळेत, संरक्षण क्षेत्राशी संबंधित पब्लिक सेक्टर युनिट आणि इंडस्ट्रीजमध्ये करता येणार आहे. या अभ्यासक्रमामुळे भारताच्या संरक्षण संशोधन आणि निर्मिती क्षेत्राला फायदा होणार आहे. तर संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठीही मदत होणार आहे.