विमानांच्या संरक्षणासाठी डीआरडीओचे नवे तंत्रज्ञान

विमानांच्या संरक्षणासाठी डीआरडीओचे नवे तंत्रज्ञान

भारतीय संरक्षण संशोधन संस्थेने (डीआरडीओ) हवाई दलाच्या विमानांना संरक्षण देण्यासाठी नवा शोध लावला आहे. यामुळे हवाई दलाच्या विमानांना अधिक संरक्षण उपलब्ध होणार आहे.

डीआरडीओ सैन्यासाठी आजवर विविध संशोधन करत आली आहे. त्याचप्रमाणे आत्ताही आपल्या विमानांना संरक्षण प्रदान करणारी संरक्षण यंत्रणा शोधली आहे. ॲडव्हान्स्ड चाफ टेक्नॉलॉजी (एसीटी) मार्फत शत्रूच्या रडारपासून आपल्या विमानांना संरक्षण मिळणार आहे. या बाबत संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमधील भारतीयांना तालिबानने का सुरक्षा पुरवली? वाचा सविस्तर…

तालिबानी पिलावळीचा धोका…

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमान्यांची रीघ

‘शिवगर्दी’मुळे कोरोना पसरत नाही

डीआरडीओकडून संरक्षण विषयात संशोधन करण्यात आले आहे. यापूर्वी डीआरडीओने अशाच प्रकारचे संशोधन नौदलाच्या नौकांसाठी केले होते. नौकांना क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासठी याचा वापर करण्यात येणार होता. त्याच धर्तीवर विमानांना सुरक्षा देण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. चाफ तंत्रज्ञान डीआरडीओच्या राजस्थानातील जोधपूर येथील प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आले होते.

डीआरडीओने यापूर्वी देखील अनेक उत्तमोत्तम तंत्रज्ञान शोधून काढले आहे. डीआरडीओने तेजस विमान, अर्जून रणगाडा यांची निर्मिती देखील केली आहे. त्याबरोबरच कोविड काळात देखील डीआरडीओकडून देशवासियांसाठी अनेक जीवनावश्यक वस्तूंची निर्मीती करण्यात आली होती. आता डीआरडीओने पुन्हा एकदा आपल्या संशोधन क्षमतेची चुणूक दाखवून दिली आहे.

Exit mobile version