31 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेष‘रंगकर्मी’ जिंकले; प्रशांत दामलेंच्या पॅनलचे दणदणीत यश

‘रंगकर्मी’ जिंकले; प्रशांत दामलेंच्या पॅनलचे दणदणीत यश

अ.भा. मराठी नाट्य परिषदेवर प्रतिस्पर्धी प्रसाद कांबळींच्या पॅनलला दोन जागा

Google News Follow

Related

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मुंबई मध्यवर्ती शाखेतील १० जागांपैकी ८ जागांवर प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार तर उर्वरित दोन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. त्यानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणी झाली. अखेर पहाटे नाट्य परिषदेचा निकाल जाहीर करण्यात आला.

मुंबई मध्यवर्ती शाखेत एकूण १,३२८ जणांनी मतदान केले. त्यात माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात १,२४५, गिरगांव येथे ८३ आणि मुंबई उपनगर शाखा (मुलुंड – बोरीवली – वसई) येथे एकूण ७३० जणांनी मतदान झाले.

‘रंगकर्मी नाटक समूहा’कडून प्रशांत दामले (७५९), विजय केंकरे (७०५), विजय गोखले (६६४), सयाजी शिंदे (६३४), सुशांत शेलार (६२३), अजित भुरे (६२१), सविता मालपेकर (५९१), वैजयंती आपटे (५९०) भरघोस मतांनी विजयी झाले. तर आपलं पॅनलमधून प्रसाद कांबळी (५६५) आणि अभिनेत्री सुकन्या मोने (५६७) विजयी झाल्या.

हे ही वाचा:

पायधुनीत तलवार गँगचा धूमाकूळ, दुकानात नाचविल्या नंग्या तलवारी

महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्याला गालबोट, उष्माघातामुळे १० जणांचा मृत्यू

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा उष्माघातातील मृतांमध्ये आठ महिला, तीन पुरुष

रत्नागिरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की त्रासासाठी…

प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह या पॅनलमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. या पॅनलमध्ये विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यांचा समावेश आहे. तर प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’मध्ये सुकन्या मोने, मंगेश कदम, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू यांचा समावेश होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा