डॉ. उदय निरगुडकर मराठी वाड्मय परिषद, बडोदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

७-८ फेब्रुवारीला होणार संमेलन

डॉ. उदय निरगुडकर मराठी वाड्मय परिषद, बडोदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

मराठी वाड्मय परिषद, बडोदेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात ७४व्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर भूषवणार आहेत.

या संस्थेचे हे संमेलन ७ आणि ८ फेब्रुवारीला होत आहे. १९३१ ला मराठी वाड्मय परिषदेची स्थापना झाली. तेव्हापासून ही संस्था मराठी भाषेची सेवा करत आहे.

या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. निरगुडकर यांनी स्वीकारावे अशी विनंती संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. डॉ. निरगुडकर यांनी हे अध्यक्षपद स्वीकारण्यास संमती दिली आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशी-रोहिंग्यांच्या मुद्द्यावर उबाठाची गोची?

मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत आणि प्रवीण कुमारला खेलरत्न!

“दिल्लीचे सरकार खोटे आणि लुट करणारे सरकार”

रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे मृत झालेला रुग्ण झाला जिवंत!

डॉ. निरगुडकर हे पत्रकार आणि संपादक म्हणून गेली अनेक वर्षे विविध माध्यमात आपल्या स्पष्ट आणि परखड भूमिका मांडत आले आहेत. त्याशिवाय, सेफॉलॉजिस्ट म्हणून त्यांनी आपली वेगळी छापही पाडली आहे.

Exit mobile version