डॉ. तुषार सावडावकर यांच्या ‘वास्तुसहस्त्र लेखावली’ला विशेष महापौर पुरस्कार

डॉ. तुषार सावडावकर यांच्या ‘वास्तुसहस्त्र लेखावली’ला विशेष महापौर पुरस्कार

ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, तेजोवलय, ऊर्जा, जिओपॅथिक स्ट्रेस, रेडियॉनिक अशा अनेक विषयांवर संशोधन करून आपल्या लेखनाद्वारे सर्वसामान्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न डॉ. तुषार यशवंत सावडावकर करत आहेत. त्यांनी वास्तूशास्त्र या विषयावर वर्तमानपत्रांत केलेल्या प्रदीर्घ लेखनाची दखल मुंबईच्या महापौरांकडून विशेष पुरस्कार देऊन घेण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात डॉ. सावडावकर यांनी वास्तुशास्त्रावर ५ वर्षे लेखन केले. या लेखांचा संग्रह म्हणून “वास्तुसहस्त्र लेखावली” या ग्रंथाची निर्मिती झाली. या ग्रंथास विविध मान्यवरांची सदिच्छा पत्र प्राप्त झाली आहेत. “वास्तुसहस्त्र लेखावली” या ग्रंथास १४ जानेवारीला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते विशेष महापौर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेत महापौरांच्या कक्षात हा सत्कार समारंभ पार पडला. डॉ. सावडावकर यांनी अल्टर्नेटिव्ह मेडिसिन यात डॉक्टरेट मिळविली आहे. डॉ. सावडावकर यांचा ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्रावर गाढा अभ्य़ास आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेत सुधारणा करण्यासाठी कसे उपाय केले जातात, याचे मार्गदर्शनही त्यांनी केले आहे. मकरसंक्रांतीचे औचित्य साधून महापौरांच्या हस्ते डॉ. सावडावकर यांना गौरविण्यात आले.

हे ही वाचा:

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुन्हा शाळा सुरू

‘गोव्यात तृणमूल कुणाला आपलीशी वाटत नाही तर ‘आप’ दिवसरात्र खोटे बोलते’

गोवा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रीकरांना दिले पर्याय

‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलना टाळे’

 

महापौर पेडणेकर यावेळी म्हणाल्या की, ‘वास्तुसहस्त्र लेखावली’ हे प्रत्येकाने संग्रही ठेवण्याजोगे पुस्तक आहे. डॉ. सावडावकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या लेखमालेचे पुस्तक लिहिले. क्रिस्टल पद्धतीच्या माध्यमातून वास्तुची तोडफोड न करता, त्या घरातील लोकांचे आरोग्य, आर्थिक स्थिती कशी चांगली राहील, याचा उल्लेख पुस्तकात आहे. त्यावर २० वर्षे त्यांनी संशोधन केले आहे. रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार केले. त्यांच्याकडे जी यंत्रे आहेत त्यावर वास्तू सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे ते सांगतात. कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचा श्रीगणेशा भाग १ आणि मानवी तेजोवलयाचे रहस्य पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांना वाचकांची पसंती मिळाली आहे.

Exit mobile version