कारुळकर प्रतिष्ठान आणि विराट हिंदुस्तान संगम यांच्या संयुक्त विद्यमाने तडफदार हिंदुत्ववादी नेते मा. खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी आणि आदरणीय डॉ.राज वेदम हे वक्ते “ऐतिहासिक, पारंपारिक आणि समकालीन दृष्टिकोनातून भारतीयत्वाची व्याख्या” या विषयावर आपले मौलिक विचार मांडणार आहेत. शनिवार १६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ आणि रविवार १७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत ही व्याख्याने होणार आहेत. गोवर्धन इकोव्हिलेज, गलतरे, पो. हमरापुर, तालुका: वाडा, महाराष्ट्र ४२१ ३०३ येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. राष्ट्रवादी विचारसरणीच्या श्रोत्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित दर्शवावी.
डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे खासदार असून त्यांनी आपल्या सडेतोड भाषणांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. त्यामुळे ते हिंदुत्ववादी जनसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत. या दोन व्याख्यात्यांसह इतरही मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. या व्याख्यानांमध्ये आर्य द्रविडी ढोंगीपणा, तत्कालिन भारताची प्रतिमा आणि पारंपरिक भारतीय प्रतिमा, भारतीय स्वत्वाची उत्क्रांती, हिंदू स्वत्वाचे पुनरुज्जीवन, दलित आणि सवर्णांच्या पलिकडे, रामायण, महाभारताचे तिरकसपणे केले जाणारे समीक्षण, तत्कालिन वर्णाश्रम, परंपरा आणि सण यांचे मह्त्व अशा विषयांवरही प्रकाश टाकण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
शरद पवारांनी पुन्हा बाबासाहेब पुरंदरेंचा मुद्दा काढला उकरून
सोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे म्हणाले …..
‘KGF- Chapter 2’चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बोलबाला
‘देशातल्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटायची’
कारुळकर प्रतिष्ठान आणि डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा ऋणानुबंध खूप जुना आहे. आज डॉ. स्वामींचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. कारुळकर प्रतिष्ठानच्या टीमने त्यांचे जोरदार स्वागत केले.