भारताच्या मराठमोळ्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. डॉ. शर्वरी यांनी २८ डिसेंबर रोजी तुर्कीमधील इस्तंबूल येथे आयोजित २०२१ आशियाई क्लासिक आणि एपीएफ बेंच प्रेस आणि पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये चार सुवर्णपदक कमावली आहेत.
डॉ. शर्वरी यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये सहभाग घेतला होता. तिथे त्यांनी मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी चार सुवर्णपदक भारताच्या नावे केली. यावेळी त्यांनी एकूण ३५० किलो वजन उचलले जे तिथे सर्वाधिक होते.
स्पर्धेच्या यशानंतर डॉ. शर्वरी यांनी ‘इंडिया टुडे’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या यशाचा अत्यंत आनंद झाल्याचे सांगितले. तीन वर्षांपासून घेतलेल्या अथक प्रयत्नांचे आणि मेहनतीचे हे फळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी आणि पतीने पाठींबा दिल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
डॉलरच्या बदल्यात चक्क रिन साबणाच्या वड्या
महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे बाद फेरीत धडकले
‘ठाकरे सरकारने डिग्री विकायला काढल्या तर आश्चर्य वाटणार नाही’
‘बचपन का प्यार’ फेम सहदेवचा गंभीर अपघात
शर्वरी या महाराष्ट्रातील पुण्याच्या असून त्यांनी यापूर्वी जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. गोव्यामधील त्यांच्या कामगिरीनंतर त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. यावर्षी जून महिन्यात त्यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी साडीमध्ये पॉवरलिफ्टिंग केले होते.