पद्मश्री डॉ. रमाकांत शुक्ला यांचे निधन

पद्मश्री डॉ. रमाकांत शुक्ला यांचे निधन

प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक डॉ. रमाकांत शुक्ला यांचे बुधवार, ११ मे रोजी निधन झाले. रमाकांत हे ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमाकांत यांच्या पश्चात पत्नी रमा शुक्ला आणि तीन मुले आहेत.

रमाकांत हे ट्रेनने प्रवास करत होते. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने ट्रेन अलिगड स्थानकावर ट्रेन थांबवण्यात आली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच नातेवाईक अलिगडला पोहोचले असून कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह दिल्लीत आणण्यात येत आहे.

हे ही वाचा:

अल जझिराच्या महिला पत्रकाराचा गोळीबारात मृत्यू

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन

कर्नाटकात मशिदीवर फडकला भगवा

राणा दाम्पत्याची पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा

भारत सरकारने २०१५ साली रमाकांत शुक्ला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. डॉ. रमाकांत हे केवळ संस्कृतचेच नव्हे, तर हिंदीचेही अभ्यासक होते. दिल्ली विद्यापीठांतर्गत राजधानी कॉलेजच्या हिंदी विभागाशी ते दीर्घकाळ निगडीत होते. २००५ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी संस्कृत भाषेच्या संवर्धनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. संस्कृत भाषेशी संबंधित असलेल्या देववाणी परिषद या संस्थेचे ते संस्थापक होते. याशिवाय त्यांच्या देखरेखीखाली पंडित राज महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version